‘टिळकांचं स्वप्नं भाजप..; Ravindra Dhangekar यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

‘टिळकांचं स्वप्नं भाजप..; Ravindra Dhangekar यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने (Kasaba Bypoll 2023) हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपकडून टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारल्यावर आता त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. शैलेश टिळकांनी देखील रासनेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. आता यावेळी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी मोठं विधान केलं.

भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात कसबा पोटनिवडणुकीत थेट लढत होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पुण्यात दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून भाजपच्या रासनें पाठोपाठ काँग्रेसच्या धंगेकर यांनी देखील टिळकवाड्यात जाऊन शैलेश टिळकांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मुक्ता टिळकांना अभिवादन केले. नंतर त्यांनी मुक्ताताईंचं स्वप्नं भाजप नाही, तर काँग्रेस पूर्ण करणार असल्याचं विधान करत रविंद्र धंगेकर यांनी भाजपला आव्हान दिलं.

जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा २००९ मध्ये धंगेकर यांनी निवडणूक लढवली होती. अवघ्या ७ ते ८ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. त्यावेळी गिरीश बापट विजयी झाले. त्यांनी बापटांना चांगली लढत दिली होती. रवींद्र धंगेकर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. मनसेत असताना त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघात अनेक सामाजिक कामे केली आहेत. जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विधानसभा २००९ मध्ये धंगेकर यांनी निवडणूक लढवली. अवघ्या ७ ते ८ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यावेळी गिरीश बापट विजयी झाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube