Kasba Peth Bypoll उमेदवारी मिळताच रासनेंकडून संजय काकडेंना दे धक्का!

Kasba Peth Bypoll उमेदवारी मिळताच रासनेंकडून संजय काकडेंना दे धक्का!

पुणे : कसबा मतदार संघ (Kasba Peth Bypoll) पोटनिवडणुकीत भाजपकडून (BJP) दोन्ही वरिष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. गिरीश बापट आजारी असल्याने त्यांची अनुपस्थिती समजू शकते. परंतु, भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) हे सुरुवातीपासून कसबा पोटनिवडणुकीसाठी सक्रीय होते. आधी सर्व बैठकांना उपस्थित राहुन नियोजन करत होते. मात्र, भाजपचा उमोदवार निश्चित झाला. तेव्हापासून ते अचानकपणे गायब झाल्याचे चित्र आहे. त्यांना कोणत्याही बैठकांना निमंत्रण दिले जात नाही. एवढंच कशाला पक्षाच्या वतीने या निवडणुकीच्या निमित्ताने लावलेल्या फ्लेक्सवरुन त्यांचा फोटो देखील हटवण्यात आला आहे. त्यामुळे हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी संजय काकडेंच्या अनुपस्थितीची चर्चा चांगलीच रंगली आहे.

कसबा विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार संजय काकडे आणि खासदार गिरीश बापट यांना निमंत्रण नसल्याची जोरदार चर्चा सुरु होती. गिरीश बापट हे विद्यमान खासदार आहेत. शिवाय त्यांनी सलग पाच वेळा कसबा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळं त्यांना देखील मानणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत, असे असून देखील भाजपच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी या दोन ज्येष्ठ नेत्यांना का डावलण्यात आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. संजय काकडे आणि गिरीश बापट यांना डावलले तर त्याचा फटका भाजपला बसू शकतो अशी चर्चादेखील होत आहे.

हेमंत रासने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकावर संजय काकडे यांचा फोटो नाही. तसेच, अर्ज भरण्यासाठी भाजपकडून जो मेसेज व्हॉट्सॲप वर पाठवला आहे. त्यातही संजय काकडे यांचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे खासदार गिरीश बापट यांचेही नाव त्या मेसेजमध्ये नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube