Kasba Peth Bypoll वंचितची एन्ट्री… प्रफुल्ल गुजर यांचे नाव आघाडीवर!

Kasba Peth Bypoll वंचितची एन्ट्री… प्रफुल्ल गुजर यांचे नाव आघाडीवर!

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba Peth Bypoll) आता वेगाने घडामोडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचा उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) जाहीर झाला आहे. तर महाविकास आघाडीकडून (MVA) लवकरच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीचा अद्याप घटक नसलेला परंतु, शिवसेनेशी नुकतीच युती झालेल्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत उडी घेतली आहे. वंचितचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुजर (Prafull Gujar) यांना उमेदवारी देण्याचे संकेत वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी दिला आहेत.

वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी पक्षाची भूमिका माध्यमांसमोर जाहुर केली आहे. त्यात त्यांनी आम्ही अद्याप महाविकास आघाडीचे घटक नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच निवडणूक लढवण्याचे संकेत दिला आहे.

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युती नंतर कसबा आणि पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या पोट निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला होता, असे सांगत वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, मात्र या दोन्ही ठिकाणी शिवसेना लढत नसल्याचे दिसत आहे. महविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचा अद्याप काही संबंध नसल्याने या दोन्ही जागे संदर्भात पक्षाच्या वतीने लवकरच भूमिका जाहीर करण्यात येईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube