पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केलं; किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

  • Written By: Published:
पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केलं; किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे लाईफलाईन या अस्तित्वात नसलेल्या कंपनीला पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिल गेलं. त्यामुळे १०० कोरोना रुग्णाचे शारीरिक नुकसान संजय राऊत यांच्या भागीदार सुजित पाटकर यांच्यामुळे झालं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

या कंपनीवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पोलिसात धाव घेतली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की या कंपनीमुळे काहींचे किडनी, काहींचे हार्टचे नुकसान झाले. ज्या कंपनीला लाईफलाईन कंपनीमुळे झालं आहे. जी कंपनी अस्थित्वात नव्हती, अशा कंपनीला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्या कंपनीला पुण्यातील शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट दिल गेलं.

Ghungaru Teaser: सबसे कातील गौतमी पाटीलच्या ‘घुंगरु’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित

पुणे महापालिकेने स्वतः त्याचा रिपोर्ट केला, तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी स्वतः तो रिपोर्ट पहिला होता. त्यामुळे PMRDA स्वतः त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट टाकले पण त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, त्यामुळे त्या कंपनीवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

यातील एफ आय आर ची गुन्हा म्हणून नोंद घ्यावी आणि PMRDA ने ब्लॅक लिस्ट मध्ये टाकल्यानंतरही या कंपनीला वरळीमधील कंत्राट कसं मिळालं. आदित्य ठाकरे यांनी देखील वरळी येथे आय सी यू चा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. मी आज दोन्ही ट्विट केलं आहे. पुणेकरांच्या जीवाशी खेळण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अशी टीका किरीट सोमय्या यांनी केली.

Vijay Wadettiwar : रामाच्या नावे मत मागायला अयोध्येत, जनता शरयू नदीत डुबवेल

ते पुढे म्हणाले की, “आज पोलिसांनी मला आश्वासन दिलं आहे की यावर आता कारवाई होईल. त्याकाळचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे शरद पवार यांचे पोलिस आयुक्त होते. त्यावेळेस पोलिसांनी फसवी एफ आय आर दाखल केली होती. ७ दिवसाची मुदत मी दिली आहे की लाइफ्लाईन कंपनी आणि महापालिका अधिकारी पी एम आर डी ए मधील अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल पाहिजे. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाही झाली तर मी पुन्हा पुढच्या आठवड्यात पुन्हा येईल. असा इशाराच सोमय्या यांनी आज दिला आहे.

सुजित पाटकर यांना कोणी कंत्राट दिले? उद्धव ठाकरे यांनीच दिला त्यांनी अनेक वेळा तारीख दिल्या की सरकार कोसळणार म्हणून याचा अर्थच त्यांच्या मध्येच अस्वस्थता आहे. जुलै मध्ये सरकार आलं आणि ऑगस्ट मध्ये सोमय्या यांनी लाइफ्लाईन विरोधात गुन्हा दाखल केला याचा तपास सुरू आहे, अशी माहितीही सोमय्या यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube