२०१९ मध्ये मंत्रिपद मिळणं का गरजेचं होतं? आमदार थोपटेंनी लॉजिकच सांगितलं

२०१९ मध्ये मंत्रिपद मिळणं का गरजेचं होतं? आमदार थोपटेंनी लॉजिकच सांगितलं

MLA Sangram Thopate : सन 2019 मध्येच आमदार संग्राम थोपटे मंत्री झाले असते. तशा चर्चा होत्या. कार्यकर्त्यांनी तयारीही केली होती. पण असं नेमकं काय घडलं की थोपटेंना मंत्रिपद मिळता मिळता राहिलं. या प्रश्नाचं उत्तर स्वतः संग्राम थोपटे यांनीच लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला. आमदार संग्राम थोपटेंनी लेट्सअप मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पुणे जिल्ह्यात पक्ष आणि संघटनेची ताकद वाढवायची असेल कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असेल तर एक मंत्रिपद देणं गरजेचं होतं, असे संग्राम थोपटे म्हणाले.

2019 मध्ये असं ठरलं होतं किंवा तशी चर्चा होती की संग्राम थोपटे मंत्री होणार. कार्यकर्त्यांनी तयारीही केली होती. मग असं काय घडलं की तुमचं मंत्रिपद गेलं असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर थोपटे म्हणाले, ‘मला मंत्रिपद मिळणं यामागे लॉजिक होतं. पुणे जिल्ह्यात आमदारांची संख्या 21 आहे. चार खासदार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जितके खासदारांच्या जागा आहेत त्याच्या निम्मे खासदार पुण्यात आहेत.’

‘जिल्ह्यात पक्ष आणि संघटनेची ताकद वाढवायची असेल कार्यकर्त्यांना ताकद द्यायची असेल तर एक मंत्रिपद देणं गरजेचं होतं. परंतु मध्यंतरीच्या काळात दुर्लक्ष झालं त्यामुळे पुणे जिल्ह्यात पक्षाची वाताहत झाली. त्यामुळे या परिस्थितीत बदल करण्याच्या उद्देशाने एक तरी मंत्रिपद मिळणं गरजेचं होतं. परंतु, दुसऱ्यांना संधी मिळाली म्हणून नाराज असण्याचं कारण नाही. पण कार्यकर्त्यांनाही भावना असतातच ना. तीनदा निवडून आल्यानंतर मंत्रिपद मिळायला हवं अशा त्यांच्या भावना होत्या त्यात कार्यकर्त्यांचा काही दोष नाही. त्या भावनांचा थोडा उद्रेक झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयाची तोडफोड झाली. खरंतर ही घटना घडल्यानंतर मला समजलं. आधीच माहिती असतं तर ही घटना घडलीच नसती. कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशीचा प्रकार अनावधानाने घडला होता.’

पवार कुठलेही संकेत देत नाहीत; राऊतांनी एका वाक्यात सर्व चर्चा ठरवल्या फोल!

विश्वजीत कदम आणि सत्यजित पाटील यांच्या स्पर्धेत आपण कुठेतरी मागे पडलो असं वाटतं का, या प्रश्नावर उत्तर देताना थोपटे म्हणाले, ‘त्यांची स्पर्धा माझ्याबरोबर असण्याचं कारण नाही. त्यांचे जिल्हे वेगळे आहेत. आम्ही एकाच पक्षात काम करतोय त्यामुळे स्पर्धा कशाची असा प्रश्नच निर्माण होत नाही’ असे आमदार थोपटे यांनी स्पष्ट केले.

हिंजवडीत वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. लोक तासनतास या वाहतूक कोंडीत अडकतात. आमदार म्हणून तुम्ही या प्रश्नाकडं कसं पाहता? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर थोपटे म्हणाले, ‘ही वस्तुस्थिती आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज साडेचार ते पाच लाख लोक ये जा करत असतात. मूळ प्रश्न वाहतुकीचा आहे. यासाठी येथे रोड तयार केलेत. आता जड वाहतूक किंवा अन्य काही चुकीच्या कामांमुळे वाहतुकीचा त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे. शहरातील मेट्रोचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. जोपर्यंत लोकल ट्रान्सपोर्टमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत या परिस्थितीत सुधारणा होणार नाही.’

इंडस्ट्रीयल एरिया असल्याने येथे कायमच वर्दळ असते. वन वे रोडही केले आहेत. मात्र वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बसमध्ये सुधारणा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. हिंजवडी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी मी बऱ्याचदा चर्चा करत असतो. नारायण राणे ज्यावेळी एमआयडीसीचे मंत्री होते. त्यावेळी बैठक झाली होती. देसाई साहेब असतानाही बैठक झाली होती. त्यावेळी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. आता वाहतुकीच्या समस्येने काही कंपन्या बाहेर जात आहेत. आता आमदार म्हणून आमचीही काही जबाबदारी आहे. आम्ही सरकारकडे निधीची मागणी करत असतो.’

राज्याचा विकास जयंत पाटील योग्य करु शकतात; फडणवीसांच्या चॅलेंजनंतर पवारांचं सूचक विधान

लोकसभेनंतर पुण्यातील विकासकामांना कात्री

‘पण, आता जास्त फोकस मेट्रोवर झालाय त्यामुळे बाकीच्या कामांकडे दुर्लक्ष होत आहे. निधी कमी मिळताना दिसतोय. मागील वेळी निधी दिला होता. लोकसभेची निवडणूक झाली तशी निधीला कात्रीच लागली. पालकमंत्रीच (अजित पवार) जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत. आमच्या पक्षाच्या नावाने पत्र दिलं तर त्याला निधी नाही. मग तुमची विकासाची व्याख्या नेमकी काय आहे?’ असा सवाल थोपटेंनी केला.

‘बैठकीत आम्ही अजित पवारांना लेखी पत्रही दिली आहेत. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ज्यावेळी कामांचं बुकलेट छापून आलं त्यात आम्ही सुचवलेलं एकही काम नव्हतं. आम्ही ही बाब जिल्हाधिकाऱ्यांना विचारली. जिल्हाधिकारी म्हणाले मी या समितीचा सचिव आहे. अध्यक्ष अजित पवार आहेत. अशा पद्धतीने काम सुरू आहे. याआधी असं कधी घडलं नाही. आधी चंद्रकांत पाटील पालकमंत्री होतं, गिरीश बापटही होते त्यांच्या काळात असं कधी झालं नाही मग आताच हे असं का होतंय हे कळायला मार्ग नाही. लोकसभेच्या निकालानंतरच सगळं झालंय असा आरोप संग्राम थोपटेंनी अजित पवार  यांचे नाव न घेता केला.

मला अडचणीत आणायचं तर आणा पण…

मग लोकसभेतील पराभवाचा त्यांनी तुमच्यावर राग काढला असं म्हणायचं का यावर थोपटे म्हणाले,  ‘राग तर सगळ्यांवरच निघालाय मी एकटा थोडाच होतो. याला राजकीय किनार आहे दुसरं काय म्हणता येईल. जिल्हा नियोजन समितीचा निधी अडलाय तो कुणामुळं अडलाय? विकासकामांचा निधी अडवण्याचं काय कारण? संग्राम थोपटेंशी तुमचं भांडण असेल पण सर्वसामान्य शेतकऱ्यांनी तुमचं काय केलंय. साखर कारखान्यात हजारो कामगार आहेत. त्यांच्या अडचणी आहेत. त्यांना पगार नाहीत. तुम्हाला संग्राम थोपटेला अडचणीत आणायचं तर आणा जनता काय उत्तर द्यायचं ते देईल. पण मला अडचणीत आणण्याच्या नादात तुम्ही सर्वसामान्य शेतकरी आणि कामगारांची जी पिळकवणूक करताय ती चुकीची आहे, अशी टीका आमदार संग्राम थोपटेंनी अजित पवार यांच्यावर केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube