पवार कुठलेही संकेत देत नाहीत; राऊतांनी एका वाक्यात सर्व चर्चा ठरवल्या फोल!

  • Written By: Published:
पवार कुठलेही संकेत देत नाहीत; राऊतांनी एका वाक्यात सर्व चर्चा ठरवल्या फोल!

मुंबई : शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबत पवारांनी केलेल्या सूचक विधानावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये जयंत पाटलांवर मोठी जबाबदारी असणार आहे असे म्हणत राज्याचा विकास जयंत पाटील योग्य पद्धतीने करू शकतात याची मला खात्री आहे, असा विश्वास व्यक्त केला होता. शरद पवारांच्या (Sharad Pawar) या विधानानंतर जयंत पाटील मविआकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार का? याची चर्चा सुरू झाली असून, पवारांच्या या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sanjay Raut On Sharad Pawar Statement)

मोठी बातमी : चर्चित IRS अधिकारी समीर वानखेडे सुरू करणार राजकीय इनिंग; पक्ष अन् मतदारसंघही ठरला

एका वाक्यात राऊतांनी सर्व चर्चा ठरवल्या फोल!

विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर काल (दि.16) महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांनी पहिले मविआने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा असे आव्हान दिले होते. त्यानंतर पवारांनी जयंत पाटलांबाबत वरील सूचक विधान केले आहे.

यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांचे तसे संकेत असतील तर, त्यावर आम्ही चर्चा करू, पण शरद पवार कुठलेही संकेत देत नाहीत असे म्हणत राऊतांनी एका वाक्यात जयंत पाटलांच्या नावावरून सर्व चर्चा फोल ठरवल्या आहेत. ते म्हणाले की, एका पक्षात दोन मुख्यमंत्री होत नाहीत या पदासाठी अनेकांची नावं चर्चेत असून, शेवटी हे राजकारण आहे लोक कोणाच्या चेहऱ्याकडे जाऊन मतदान करणार आहे हे अख्खा देश जाणतो त्यासाठी घोषणा करायची गरज नसल्याचेही राऊतांनी स्पष्ट केले.

‘पिपाणी’ चिन्हाचा त्रास होऊ शकतो; पण, लोकसभेएवढा नाही; पवारांच्या नातवाला फुल्ल विश्वास

उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी…

यावेळी राऊतांनी न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी हटवण्यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहण्यासाठी न्यायदेवतेच्या हातातील तलवार काढल्याचे आणि डोळ्यावरील पट्टी काढण्यात आल्याचे ते म्हणाले. न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन्याय करणाऱ्यांचा मुंडका उडवून टाकण्यासाठी असते. तर, समोर किती मोठी व्यक्ती आहे ती श्रीमंत आहे की, शक्तिमान आहे ते पाहून मी न्याय करणार नाही यासाठी डोळ्यावर पट्टी असते. पण गेल्या चार वर्षात असा कोणताच न्याय झाला नाही.

निवडणुकीचा बिगुल वाजला, अजितदादा गटाची 37 उमेदवारांची यादी तयार, नगरमध्ये चार जागा मिळणार?

असंवैधानिक सरकार सर्वोच्च न्यायालयाने डोळ्यावर पट्टी बांधून न्याय दिला नाही. संविधानाची हत्या रोज होत आहे. संविधानाचा पुस्तक हातात देऊन न्यायालय आरएसएसचा अजेंडा पसरवत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संविधान हातात घेणं भाजप आरएसएसची परंपरा आहे. न्याय देवतेच्या हातात तराजू दिला म्हणजे ते कुणालाही भेदभावाने बघणार नाही. संविधानाच्या 10 शेड्युलवर तुम्ही निर्णय घेऊ शकला नाहीत पट्टी काढून काय होणार?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube