‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव’.. धंगेकरांचं नवं गाणं तुफान व्हायरल..

‘अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव’.. धंगेकरांचं नवं गाणं तुफान व्हायरल..

Ravindra Dhangekar New Song :  पोटनिवडणुकीत ‘हू इज धंगेकर ?’ म्हणत आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना डिवचणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना टार्गेट करणारे एक गाणे सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. पुण्यात सध्या या गाण्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. धंगेकर आता या मतदारसंघाचे आमदार आहेत. पोटनिवडणुकीवेळी त्यांची आणि भाजपच्या नेत्यांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती.

विशेषतः चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराच्या वेळी ‘हू इज धंगेकर’ असे म्हणत धंगेकर यांना डिवचले होते. त्यानंतर निवडून आल्यावर धंगेकर यांनीही खास स्टाइलमध्ये उत्तर दिले. पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी फक्त एकाच वाक्यात उत्तर दिले होते. आय अम धंगेकर.. त्यांच्या या उत्तराची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती.

राहुल गांधी पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना भेटणार? विरोधकांची ‘वज्रमुठ’ मजबूत

त्यानंतर आता परत एकदा तरुणाईला वेड लावणारे एक खास गाणे काही दिवसांपासून सोशल मिडीयावर फिरत आहे. या गाण्याचे बोल आणि त्याला असलेली चालही भन्नाट अशीच आहे. अगं चंपाबाई.. धंगेकरला  जीव थोडा लाव.. मतानं कसा उधळून टाकलाय डाव.. अशा ओळीतून कलाकारांनी हे गाणं तयार केलं आहे. चंद्रकांत पाटील यांचे प्रत्यक्ष नाव न घेता तयार केलेले हे गाणे सध्या धुमाकूळ घालत आहे.

आमदार रवींद्र धंगेकर यांचे कौतुक करणारे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्ष टार्गेट करणारे हे गाणे तरुणांनी डोक्यावर घेतले आहे. कसबा पोटनिवडणुकीत पाटील यांनी धंगेकर यांची खिल्ली उडवली होती. मुळात कसब्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी निवडणूक नव्हती तर भाजप विरुद्ध धंगेकर अशीच ही निवडणूक होती. आणि या निवडणुकीत धंगेकरांनी बाजी मारली.

‘राष्ट्रवादी’ला मोठा धक्का! राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

धंगेकर यांनी मतदारसंघात आधी केलेली कामे. त्यांची ओळख या गोष्टींमुळे त्यांना विजय मिळाल्याचे  बोलले गेले. भाजपकडून जोरदार प्रयत्न केले गेले. मात्र,  हा मतदारसंघ भाजपला राखता आला नाही. त्यात ऐन निवडणुकीचा प्रचार शिगेला असताना चंद्रकांत पाटील यांनी  Who is Dhangekar असे  विधान केले. त्यांचे हे वक्तव्य मतदारांना पसंत पडले नाही. आणि भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवात त्यांचे हे वक्तव्य देखील कारणीभूत असल्याचे  बोलले गेले. त्यानंतर आता पुन्हा पाटील यांचे नाव न घेता त्यांना टार्गेट करणारे गाणे व्हायरल होत आहे. यामुळेही नवा वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गाण्याचे बोल..

एकजुटीनं साऱ्यांच्या मतानं कसा उधळून टाकलाय डाव.. हू इज धंगेकर

अगं चंपाबाई आमदाराला जीव थोडा लाव..

पुण्यात इतिहास घडला.. एक नेता साऱ्यांना पुरून उरला..

किती सभा  घेतल्या किती नोटा वाटल्या..

पैसेवाल्यांना दावला मी दाव.. असा हा रवींद्र भाव..

कसब्याचा बादशाह हाय यो चंपाबाई..

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube