..तर तुम्हाला गिरीश बापटांच्या फोटोसमोर अश्रू ढाळावे लागतील; गोऱ्हेंनी धंगेकरांना सुनावलं

..तर तुम्हाला गिरीश बापटांच्या फोटोसमोर अश्रू ढाळावे लागतील; गोऱ्हेंनी धंगेकरांना सुनावलं

Pune News : ‘माझ्या माहितीनुसार एका उमेदवाराने (रवींद्र धंगेकर) माजी खासदार गिरीश बापट यांचा फोटो वापरला आहे. आता ते बापट यांचा फोटो वापरतात. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, की आता बापट साहेब असते तर काय म्हणाले असते? बापट साहेब, त्या फोटोतून बोलले असते. ते वाक्य मला बरोबर ऐकू आलं. ते म्हणाले असते, अरे याला आजिबात मतदान देऊ नका. हे सांगायला मी माझा फोटो वापरू दिलाय. त्यामुळे मला असं वाटतं की उगाच लोकांची फसवणूक करण्याचं काम कुणी करू नये. आता तुम्हाला निवडणुकीत काय ते कळेल मग बापट साहेबांच्या फोटोसमोर तुम्ही अश्रू ढाळू शकता.’ अशा खोचक शब्दांत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांना लगावला.

‘राज ठाकरेंनी उघडपणे शाहांची भेट घेतली, काही जण गुपचूप’ नीलम गोऱ्हेंचा खोचक टोला

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर गोऱ्हे यांनी भाष्य केले. गोऱ्हे म्हणाल्या, आपतधर्म म्हणून शिवाजीराव आढळराव पाटलांनी निर्णय घेतला असावा. राजकीय गणितं बदलली असल्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला. मात्र ते उमेदवार महायुतीचे असणार आहेत. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद त्यांना आहेत त्यामुळे ते नक्कीच निवडून येतील. विजय शिवतारे यांच्याबाबत गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर चर्चा करत आहेत. त्यामुळे त्यामध्ये मार्ग निघणार आहे. त्यांनीही आता थांबलं पाहिजे असे आवाहन आहे. कारवाई होण्याआधी त्यांनी माघार घ्यावी असे आवाहन गोऱ्हे यांनी केले.

बारामती मतदारसंघातील सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीवर बोलताना गोऱ्हेंनी चित्रपटातील एका गाण्याचा दाखला दिला. लेक लाडकी या घरची होणार सून मी या घरची या एका वाक्यात नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली.
 संजय राऊतांना पक्षाने बळीचा बकरा केलं; नीलम गोऱ्हेंचं भुवया उंचावणार वक्तव्य

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज