‘परदेशात गेले, MOU केले पण..; संभाजीराजेंच्या निशाण्यावर CM शिंदेंचा दावोस दौरा

‘परदेशात गेले, MOU केले पण..; संभाजीराजेंच्या निशाण्यावर CM शिंदेंचा दावोस दौरा

SambhajiRaje Chatrapati On CM Shinde Daos Tour : ‘बाहेरच्या देशांपेक्षा सुंदर समुद्र आपल्याकडे आहे, त्याच जोडीला संस्कार आहेत. बाहेरुन येणारे लोक गोव्यात जातात, आपले लोक परदेशात जातात समुद्र पहायला, का नाही आपण पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार देऊ शकत?. राज्यात मी अनेक ठिकाणी फिरतो तेथे उत्तर मिळते कारखाने बंद. अनेक मोठे उद्योग राज्यातून का बाहेर जात आहेत?, यावर कुणीच बोलत नाही. नुसतं परदेशात जायचं आणि एमओयु साईन करून यायचं. एमओयुवर सह्या केल्या पण त्याचे फलित काय?, किती कारखाने सुरू झाले? माझा हा साधा प्रश्न आहे’, अशा घणाघाती शब्दांत संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) यांनी राज्य सरकारच्या कारभारावर तोफ डागली.

पुणे शहरात आज स्वराज्य संघटनेच्या स्वराज्य भवन या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यानंतर बालगंधर्व रंगमंदिर येथे संघटनेचे पहिले अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात संभाजीराजे यांनी राज्यातील उद्योग, पर्यटन, सहकाराचे राजकारण, शेतकरी आत्महत्या, रोजगार या मुद्द्यांवर सरकारचे वाभाडे काढले.

‘स्वराज्य’ : नावातच ताकद; कोणाच्याही दारात जाणार नाही! पहिल्याच अधिवेशनातून संभाजीराजेंनी फुंकलं रणशिंग

ते पुढे म्हणाले, ‘आजही प्रस्थापित आहेत आणि ते माजले आहेत, त्यांना माझा विरोध आहे. चूक त्यांची नाही तर आपली आहे कारण, आपण त्यांना निवडून देत आहोत. जी जनता आहे त्यांना आता आपण सांगणं गरजेचं आहे की या गोष्टी आता येथून पुढे चालणार नाही. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य,कष्टकरी, शेतकऱ्यांत जनजागृती करायची हे आपलं ध्येय आहे.’

शिक्षणाचे बाजारीकरण, सहकार राजकारणाचा अड्डा 

‘शिक्षणाचे आज बाजारीकरण झाले आहे. अनेक ठिकाणी सरकारी शाळा बंद पडल्या आहेत. खासगीकरण जोरात सुरू आहे. राज्यातील अनेक कारखाने दुसऱ्या राज्यांत चालले आहेत, याचा विचार करा. आज परिस्थिती अशी आहे की मागासलेली राज्ये आपल्या पुढे निघाली आहेत.

राज्यातून उद्योग, कारखाने दुसऱ्या राज्यात जात आहे. आपल्याकडे सगळ्या सोया सुविधा उपलब्ध असतानाही हे घडत आहे. राज्यात कुठेही कारखाना सुरू करता येईल अशी परिस्थिती आहे, यावर का चर्चा होत नाही?, आपल्याकडे आघाडीचे उद्याोगपती आहेत त्यांना का बोलवत नाही?, त्यांच्याकडून मार्गदर्शन का घेत नाही?’ असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

त्यांना दोन जागा तरी मिळतात का, तेच बघू; ठाकरे गटातील आमदाराचा शिंदेंना टोला

‘जे कारखाने आहेत ते बंद पडले. याचे कारण नियोजनच नाही. हा रोजगाराचा भाग नाही का?, नुसतं दरवर्षी बजेटमध्ये म्हणतात लाखो रोजगार देणार पण काय तुमचे नियोजन आहे?, काय मास्टर प्लॅन आहे तुमच्याकडे? नुसतं परदेशात जायचं आणि एमओयु साईन करून यायचं. एमओयु साईन केले पण त्याचे फलित काय? किती कारखाने सुरू झाले?’ माझा हा साधा प्रश्न आहे.

‘आपल्याकडे 720 किलोमीटर सागरी किनारपट्टी आहे. कोकणातला माणूस मुंबई पुण्यात आहे. पर्यटनातून आपण का रोजगार देऊ शकत नाही. आपली लोकं बाहेरच्या देशात जातात. बाहेरच्या देशातील लोक गोव्यात येतात. पण त्यापेक्षा सुंदर समुद्र आपल्याकडे आहे. संस्कार आपल्याकडे आहे. यावर कोण बोलतं का?’, असा सरकारला टोचणारा सवाल त्यांनी केला.

सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात

‘आज शेतीची काय परिस्थिती आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात होतात. हमीभावावर कुणीच बोलत नाही. आम्ही भाव देतो म्हणता, मग पाच सात वर्षे गेली की कर्जमाफी. पण, कर्जमाफी सुद्धा जो शेतकरी राबतो त्याला मिळतच नाही. माजलेले आहेतच सगळे ते हडप करून घ्यायचे. सहकार तर राजकारणाचा अड्डा बनलाय, लोकाचं सहकार राहिलाच नाही.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube