Sharad Pawar : ‘मी लढणार नाही, भावनिक आवाहनाचा प्रश्नच नाही’; शरद पवारांचं अजितदादांना रोखठोक उत्तर
Sharad Pawar replies Ajit Pawar : ‘मी काही निवडणूकीला उभा राहणार नाही त्यामुळे भावनिक बोलण्याचे काहीच कारण नाही, बारामतीकर साधे सरळ आहेत आहेत. इतकी वर्ष त्यांची प्रतिष्ठा वाढवली बारामतीकर योग्य निर्णय घेतील, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर खासदार शरद पवार आणि अजित पवार दोन्ही पुण्यात होते. दोन्ही पक्षांचे मेळावे येथे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यानंतर खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना रोखठोक प्रत्युत्तर दिले.
काही दिवसांपूर्वी अजित पवार बारामतीत बोलताना म्हणाले होते की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आवाहन तुम्हाला करतील. इतकी वर्ष तुम्ही त्यांचं ऐकलं आता आमचं ऐका असा पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले, मी काही निवडणूकीला उभा राहणार नाही त्यामुळे भावनिक बोलण्याचे काहीच कारण नाही, बारामतीकर साधे सरळ आहेत आहेत. इतकी वर्ष त्यांची प्रतिष्ठा वाढवली बारामतीकर योग्य निर्णय घेतील.
Sharad Pawar : ईडीच्या कारवाईत एकही भाजपाचा नेता नाही; शरद पवारांनी थेट आकडेवारीच मांडली
निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालावरही पवार यांनी भाष्य केले. आम्ही निवडणूक आयोगाकडे पक्ष चिन्हाची मागणी केलेली नाही. आयोगाकडून आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी वेळ मिळू शकतो. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा घेतलेला निर्णय आश्चर्यकारकच आहे. आम्ही चिन्हच घेतले नाही तर पक्षच काढून घेतला. ज्यांनी पक्ष काढला ज्यांनी उभारी दिली, त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्याला देणे असा प्रकार या देशामध्ये आधी कधी घडला नव्हता. मात्र निवडणूक आयोगाने ते ही करून दाखवलं. पण मला एका गोष्टीची खात्री आहे की लोक या प्रकाराला कधीच समर्थन देणार नाहीत.
अजित पवारांचा दावा साफ चुकीचा
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर अजित पवार अनेकदा विकासासाठी पक्ष सोडला आणि सत्तेत आलो असे सांगत असतात. त्यांच्या या वक्तव्यावरही शरद पवारांनी उत्तर देत टोला लगावला. काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांचा हा दावा आजिबात खरा नाही. तपास यंत्रणांकडून काही नेत्यांची चौकशी सुरू होती. आता मात्र सत्तेत गेल्यानंतर चौकशी बंद झाली आहे. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला असा जो दावा केला जात आहे तो चुकीचा आहे, असे शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar : शरद पवार पक्षाचे सदस्यच नाहीत मग, अध्यक्ष कसे?; अजित पवार गटाचा युक्तिवाद