‘तो’ कार्यकर्ता पैसे वाटत होता, म्हणून मी रोखलं; आमदार दत्ता भरणेंचं स्पष्टीकरण
Dattatray Bharne News : इंदापुरातील अंथूर्णे गावात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या कार्यकर्त्याला आमदार दत्ता भरणे (Datta Bharne News) यांनी शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकारानंतर दत्ता भरणे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलायं. तो कार्यकर्ता बूथ केंद्रावर पैसे वाटप करीत होता, दमदाटीही करीत होता, लोकांना त्याला मारलं असतं, म्हणूनच मी ग्रामीण भाषेत रागवलो असल्याचं स्पष्टीकरण आमदार दत्ता भरणे यांनी दिलंय.
जान्हवी कपूरच्या ‘Mr. & Mrs. Mahi’चे फर्स्ट लूक पोस्टर आऊट; ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज
आमदार दत्ता भरणे म्हणाले, संबंधित कार्यकर्ता बूथ केंद्रावर पैसे वाटप करीत होता, दमदाटी करीत होता, त्याला लोकांनी फटके मारले असते, त्यामुळेच मी ग्रामीण भाषेत रागावलो असून मी शिवीगाळ केलेली नाही. मी एक लोकप्रतिनिधी असल्याने त्याने केलेल्या चुकीवर भाष्य केलं. या प्रकरणामध्ये माझी कोणतीही चूक नसल्याचंही आमदार दत्ता भरणे यांनी स्पष्ट केलं.
शरद पवारांना आपला पक्ष चालवणं शक्य नसावं म्हणून…; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
नेमकं काय घडलं होतं?
7 मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरु होती. याचवेळी सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्ता नाना गवळी बूथ केंद्रावर असताना अजितदादा गटाचे आमदार दत्ता भरणे कारमधून उतरले आणि नाना गवळी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी धमकी देताना दत्ता भरणे यांनी तुला गावात रहायचं का? तुझी काय औकात आहे? रात्री 6 नंतर तुम्हाला कोणीच नाही मीच सर्वांना मदत करीत असतो…नीट झक मार तू तूझी या शब्दांत भरणे यांनी गवळी यांना शिवीगाळसह धमकी दिली असल्याचा दावा नाना गवळी यांनी केला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
दरम्यान, राज्यात काल तिसऱ्या टप्प्यासाठी 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं. बारामती लोकसभा मतदारसंघात हा प्रकार घडल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी तत्काळ इंदापुरात दाखल होत कार्यकर्त्याची भेट घेतली. यावेळी संबंधित कार्यकर्त्याने सुप्रिया सुळे यांना संपूर्ण आपबिती सांगितली. घडलेली आपबिती सांगताना हा कार्यकर्ता धाय मोकलून रडल्याचंही दिसून आलं होतं.