मोदींच नेतृत्व एक वैश्विक नेतृत्व, फडणवीसांनी गायले मोदींचे गुणगान

  • Written By: Published:
मोदींच नेतृत्व एक वैश्विक नेतृत्व, फडणवीसांनी गायले मोदींचे गुणगान

पुणे : आज केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पुण्यात मोदी @ 20 मराठी अनुवाद या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडत आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना थकले नाही. यावेळी फडणवीस म्हणाले मोदींच नेतृत्व एक वैश्विक नेतृत्व, ते भारतापुरतेच नाही तर पूर्ण जगासाठी महत्वाचे आहे. मोदींनी भारताच्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन केले. मोदींनी भारताला जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवली आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये भारत खऱ्या अर्थाने प्रगती करत आहे.

तसेच फडणवीस पुढे म्हणाले मोदीजींनी भारताच्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन केले आहे. त्यांनी आपल्या देशात सर्वजण हिताय अशाप्रकारच्या योजना आणल्या, 135 कोटी जनसंख्येचा देश कशा पद्धतीने बदलू शकतो हे आपल्यलाल मोदींच्या कामातून पाहायला मिळते.

महाराष्ट्रमध्ये मोदींच्या नेतृत्वात शिंदेची आणि मी महाराष्ट्रात चे परिवर्तन घडवणार आहोत, आता आम्हाला t20 ची मॅच खेळायची आहे, आमच्याकडे आता फक्त दीडच वर्ष शिल्लक आहेत. आधीच्या सरकारने अडीच वर्षे वाया घातली असे म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. आता ही गाडी आम्ही हातामध्ये घेतली आहे. आणि त्या गाडीला मोदींचे इंजिन त्यामुळे ती सुसाट वेगाने धावेल, पाच वर्षा नंतर तुमचे सर्व स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत. असे फडणवीस शेवटी म्हणाले.

मोठी बातमी : अमित शहांच्या सुरक्षेत मोठी चूक, पोलिसांना चकवा देत एक व्यक्ती घुसला ताफ्यात… 

जाताजाता फडणवीस यांनी मोदींनी कशा रीतीने भारताचा चेहरा मोहरा बदलला हे आपल्याला मोदी @ 20 या पुस्तकमध्ये पाहायला मिळेल त्यामुळे हे पुस्तक वाचण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

शेवटी ते अमित शहांचे कौतुक करता म्हणाले काश्मीरमध्ये राहुल गांधी काँग्रेसच्या राज्यात तिरंगा फडकू शकले नाहीत परंतु आत्ता भारत जोडे च्या वेळेस त्यांना काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकवता आला हे केवळ गृहमंत्री अमित शहा यांच्यामुळे शक्य झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube