Chinchwad Bypoll कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेला ‘हा’ नेता देणार तगडी लढत ?

Chinchwad Bypoll कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेला ‘हा’ नेता देणार तगडी लढत ?

पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll ) महाविकास आघाडीचा (MVA) उमेदवार कोण असेल याची उत्सुकता होती. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) हेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मंगळवारी (दि. ७) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हा सस्पेन्स थांबवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक आणि ज्येष्ठ नगरसेवक तथा पिंपरी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांना चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली. राज्याचे विरोधी पक्षेनेता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारनंतर नाना काटे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे कोण उमेदवार अशी अनेक दिवसांपासून उत्कंठा शिगेला पोहोचली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्या नावावर शिक्का मोर्तब झाले आहे. पिंपरी महापालिका निवडणुकीत नाना काटे यांनी विकर्मी मतदान घेतल्याची नोंद आहे. तसेच त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची असलेली मोठी फळी ही त्यांची जमेची बाजू आहे.

अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी तब्ब्ल ११ जणांनी उमेदवारी मागितली होती. तसेच बाहेरील कोणाला उमेदवारी देण्यापेक्षा पक्षातील निष्ठावंत लोकांनाच उमेदवारी देण्याची मागणी सर्वांनी केली होती. इच्छुकांमध्ये ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, नवनाथ जगताप, मयूर कलाटे, राजेंद्र जगताप आणि माया बारणे आदींचा समावेश होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सर्वच इचुकांची मनधरणी करत सर्वात ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे यांच्या नावावर शिक्का मोर्तब केले.

पिंपरी-चिंचवड शहरात नाना काटे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. या कार्यकर्त्यांच्या जोरावर मागील महापालिका निवडणुकीत त्यांनी विक्रमी मतदान घेत निवडणूक जिंकली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube