पुणे मेट्रो रोखली, पोलिसांशी हुज्जत घातली ! नरेंद्र पावटेकरांची लगेच राष्ट्रवादीतून हकालपट्टी

Narendra Pavtekar expelled from sharad pawar ncp party: राज्यातील कायदा-सुव्यवस्था व इतर प्रश्नावरून शरद पवार (sharad pawar group) गटाकडून पुण्यात शनिवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलन थेट पुणे (Pune Metro) मेट्रो स्थानकावरील मेट्रो ट्रॅकवर चढून करण्यात आले. परंतु त्यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. त्याचा मेट्रोचा सेवेला फटका बसला. त्यामुळे पुणेकरांची गैरसोय झाली. त्यामुळे आंदोलनाचे नेतृत्व करणारे नरेंद्र पावटेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (ncp) हकालपट्टी करण्यात आली आहे.
‘माझ्या जन्मदात्या आईवर खोटे आरोप…’ धनंजय मुंडे भडकले, इशारा नेमका कोणाला?
राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नाही, तरुणांना रोजगार नाही, स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पुणे महानगरपालिकेच्या मेट्रोस्थानकावरील मेट्रो ट्रॅकवर चढून आंदोलन करण्यात करण्यात आली. घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून मेट्रो स्टेशनवर आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलीस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान गोंधळ पाहायला मिळाला. काही कार्यकर्त्यांनी पोलिसांवर देखील हात उचलल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. परंतु हे आंदोलन पक्षाला रुचले नाही. त्यानंतर आंदोलनचे नेतृत्व करणाऱ्या नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हकालपट्टी केली आहे.
India VS New Zealand : न्यूझीलंड कुलदीप, वरुणच्या ‘जाळ्यात’ अडकले ! अर्धासंघ पावणेदोनशे धावांत बाद
नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत.त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या. निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्य आहेत. आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची आडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही.त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.