Pune Bypoll election : ‘बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत’; राष्ट्रवादीचा मनसेवर हल्लाबोल

Pune Bypoll election : ‘बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत’; राष्ट्रवादीचा मनसेवर हल्लाबोल

पुणे : पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड मतदार संघात (Pune Bypoll election) पोटनिवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु झाली. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) व भाजपकडून (BJP) प्रचाराची जोरदार तयारी सुरु झाली. तर दोन्ही मतदार संघात मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी खोचक टीका करायला सुरुवात केली. ज्या भाजपच्या विरोधामध्ये आतापर्यंत पुण्यात मनसे (MNS) लढत होती. आता त्याच भाजपला मनसे पाठिंबा देत आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.

प्रशांत जगताप म्हणाले की, कोथरुडच्या निवडणुकीत मनसे ही भाजपविरोधात भूमिका घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि कांग्रेसची मतं मिळवली होती. मात्र कोथरूडमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देत आहे. यामुळे भाजपवर आणि मनसेवर टीका केली जात आहे. यावरून… बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत, अशा तिखट शब्दांत प्रशांत जगताप यांनी भाजपवर आणि मनसेवर टीका केली.

यावेळी त्यांनी कोथरुडच्या निवडणुकीची आठवण करुन दिली. या निवडणुकीत मनसेने भाजपच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. २०१९ मध्ये कोथरुड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. कोथरुड मतदारसंघात भाजपनं चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मनसे उमेदवार अ‍ॅड. किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र यावेळी मनसेच्या राज ठाकरेंनी भाजपच्या दबावाखाली येत त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

भाजपला सगळ्यांना आपलं करुन घ्यायचं आहे. त्यांना पोटनिवडणुकीत काही प्रमाणात भीती वाटत असणार आहे, यामुळे त्यांनी मनसेला पाठिंबा मागितला असावा, असं ते यावेळी म्हणाले. कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने फार प्रयत्न सुरु केले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरणार आहे. यानंतर ही निवडणूक बिनविरोध करावी, याकरिता मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी देखील पत्राद्वारे आवाहन केले आहे.

मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. यानंतर मनसे नेमकं कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यावर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपला पाठिंबा देणार असल्याचं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी स्पष्ट केलं. त्यामुळॆ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेवर टीका करायला सुरुवात केली. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube