Neelam Gorhe : आम्हाला कोणी गृहीत धरु नये
पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्ष्यतेखाली इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक झाली. बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या या निवडणुकीसाठी शिवसेना तैयार आहे, तरी कोणी शिवसेनेला गृहीत धरू नये.
येत्या काही दिवसतात या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांची बैठक होईल त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच स्थानिक नेत्यांशी संवाद करून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. परंतु आमची दोन्ही ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहोत असे देखील यावेळी गोऱ्हे म्हणाल्या..
विधानपरिषदेची नागपूरची आमच्या हक्काची जागा आम्ही काँग्रेसला दिली. त्यामुळे आम्हाला येथे नक्कीच संधी मिळेल. तसेच विधानपरिषदेच्या निकाल पाहता महाविकास आघाडी दोन्ही ठिकाणी आम्हाला संधी देईल असा विश्वास आहे. परंतु आम्ही आमच्या मतावर ठाम आहोत आम्ही या निवडणुका लढवणारच.
महाविकासआघाडीच्या बैठकीत कोणत्या विषयाला चर्चा करणार आहात? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच गोऱ्हे म्हणाल्या आम्ही बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत हे आता सांगू शकत नाही. आधीच सगळी रणनीती सांगायची नसते वेळ आल्यावर सगळं कळेल.
उमेदवार कोण असेल? या प्रश्नाचे उत्तर देताना गोऱ्हे म्हणाल्या आज इच्छुकांसोबत आढावा बैठक झाली आहे. अद्याप नावावर चर्चा झालेली नाही. खूप सारे इच्छुक आहेत, परंतु मातोश्रीला सर्व माहीत असतं त्यानुसार ते योग्य निर्णय घेतील.