Chinchwad Bypoll : पिंपरी चिंचवड (Chinchwad Bypoll) विधानसभेतील भाजप आमदार दिवंगत लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री भेट घेत सांत्वन केले. आमदार जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पिंपरी चिंचवड मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. […]
पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP), बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, आर.पी.आय.(RPI), राष्ट्रीय समाज पक्ष (RPI), शिवसंग्राम, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा पेठ मतदार (Kasba Peth Bypoll) संघ पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारार्थ खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांचा आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भव्य रोड शो होणार आहे. कसबा मतदार […]
विष्णू सानप पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) आणि चिंचवड विधानसभा (Chinchwad Bypoll) मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येत्या २६ तारखेला मतदान होणार असून दोन तारखेला निकाल लागणार आहे. दरम्यान, या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे. […]
पुणे : मेट्रो, जुन्या वाड्यांचे प्रश्न, गुंठेवारी सारखे महत्त्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी 200 आमदारांचे पाठबळ असणाऱ्या भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना विजयी करा, असं आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी केले. ते पाठपुरावा करून सर्व प्रश्न मार्गी लावून कसब्याचा विकास करू शकतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. भारतीय जनता पक्ष(BJP), बाळासाहेबांची शिवसेना(Balasahebanchi […]
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं आहे. कसबा पेठेतील ब्राम्हण समाज नाराज नसून नाराज असल्याचं विरोधकांकडून पसरवलं जात असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांनी उमेवारी न दिल्याने ब्राम्हण समाज नाराज असल्याचा सूर विरोधकांकडून लावण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री शिंदें […]
पुणे : निवडणूक आयोगाने शिंदे गट हाच अधिकृत शिवसेना पक्ष असल्याचा निकाल दिल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाले होते. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray v. Shinde) गटात सुरु असलेल्या संघर्षात हा शिंदे गटाला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निकालानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तर भाजप […]