पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोरच भिडल्याचं दिसून आलंय. पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.
पोर्शे कार अपघातप्रकरणी आमदार सुनील टिंग यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत कबुली दिली.
लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज झाले असून गणेशोत्सव काळात 7 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीयं.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची मुंबईला पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. तेजस्वी सातपुते यांची पुण्यात बदली झालीय.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा प्रसिध्द गायक पद्मश्री कैलास खेर यांच्या हस्ते शनिवारी 12.30 वाजता होणार
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटक करू नका असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करावी.