मोठी बातमी : पुणे मेट्रोचे लोकार्पण अन् भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्तेच होणार; नवा मुहूर्त ठरला

  • Written By: Published:
मोठी बातमी : पुणे मेट्रोचे लोकार्पण अन् भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्तेच होणार; नवा मुहूर्त ठरला

Pune Metro: पुणे शहरातील मेट्रोचा (Pune Metro) महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे लोकार्पण, तर स्वारगेट ते कात्रज या विस्तारित भुयारी मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुरुवारी होणार होते. परंतु बुधवारी झालेला मुसळधार पाऊस व गुरुवारी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पुण्यात पंतप्रधान मोदी यांचे सभा होणार होती. पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा दौरा रद्द झाला. भुयारी मार्गाचे उद्घाटन लगेच करू नागरिकांना सेवा द्यावी, अशी मागणी विरोधकांनी करत सत्ताधाऱ्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. आता मेट्रोचे लोकार्पण आणि भूमिपूजन रविवारी (29 सप्टेंबर) पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे करणार आहेत. ( PM Narendra Modi will inaugurate the District Court to Swargate and lay Foundation of Swargate Katraj section on Sunday 29th Sept through VC)

मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन केले जाणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यात मोदींचे पुणे विमानतळावर 4 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार होते. त्यानंतर ते शिवाजीनगर स्थानकावर येऊन मेट्रोने शिवाजीनगर ते स्वारगेट असा प्रवास करणार होते. भुयारी मार्गाचे लोकार्पण केल्यानंतर मोदी वाहनाने स.प महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल होणार होते. येथे मोदींची जाहीर सभा पार पडणार होती. मोदींच्या पुणे दौऱ्यात मेट्रोसह एकूण 12 प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार होते. तसेच मोदी भिडेवाडा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाची पायाभरणी करणार होते. मात्र पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

Assembly Election 2024 : शरद पवारांचा दौरा ठरला, चार विधानसभा मतदारसंघांतील गणिते फिरणार?


विरोधकांच्या मागणीला प्रतिसाद ?

पुणे मेट्रोसह इतर विविध विकास कामांचे उद्घाटन होणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे काँग्रेसने दंड थोपटत या मेट्रोचे उद्घाटन करण्याची वेळ आणि तारीख जाहीर केली. आम्ही आज मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची वाट बघणार आहोत. त्यांनी ऑनलाईन का होईना पण मेट्रोचे उद्घाटन करावे अशी मागणी पुणे काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. ‘मेट्रो आज सुरू केली नाही तर, ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्या (दि.27) सकाळी 11 वाजता मेट्रोचे उद्घाटन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर माध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते म्हणाले जर पुणे शहराला मेट्रो 3 वर्षांपूर्वी मिळाली पाहिजे होती मात्र त्याला आठ वर्ष लागली. आम्ही पुणे शहराच्या विकासाला विरोध करत नाही. म्हणून आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट पाहणार आहोत. त्यांनी आज ऑनलाईन का होईना पण मेट्रोचे उद्घाटन करावे.जे आज मेट्रोचे उद्घाटन झाले नाही तर उद्या सकाळी 11 वाजता आम्ही मेट्रोचे उद्घाटन करू आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना मेट्रो रन करण्याची विनंती करणार आहोत आणि जर अधिकाऱ्यांनी मेट्रो रन केली नाही तर उद्यापासून त्यांच्या दालनात बैठा आंदोलन आम्ही करणार आहोत, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यानंतर आता ऑनलाइन उद्घाटन होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube