PMC Election : खरचं वसंत मोरेंना फक्त 600 मतं मिळाली? पराभवानं ‘कात्रज’चा घाट दिसला का?
PMC Election पुणे पालिकेची निवडणूक जशी तात्यांसाठी महत्त्वाची होती त्याहीपेक्षा ती मुलगा रूपेशच्या राजकीय श्रीगणेशासाठी महत्त्वाची होती.
PMC Election Vasant More : पुणे अवघ्या शहराचं लक्ष लागून राहिलेली महापालिका. त्यातही दोन प्रभागांच्या निकालांनी नेत्यांसह मतदारांचाही श्वास रोखायला लावला. ते प्रभाग म्हणजे प्रभाक क्रं. 9 आणि प्रभाग क्रं.38. या प्रभागात उमेदवार होते अमोल बालवडकर आणि तात्या म्हणजेच कधीकाळचे मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांचे. या दोन्ही प्रभागात झालेल्या टफ फाईटमध्ये एकीकडे बालवडकर विजयी झाले परंतु, दुसरी फायर ब्रँड नेते वसंत मोरेंना पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर तात्यांना केवळ 600 मते मिळाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत होती. पण खरचं मोरेंना फक्त 600 मते मिळाली का? त्यांना नेमकी किती मते मिळाली आणि खरचं वसंत मोरेंना पराभवामुळे कात्रचजा घाट दिसला का? त्याबद्दल जाणून घेऊया…
रविंद्र चव्हाण; पक्षासाठी 24 तास समर्पित कार्यकर्ता कसा ठरला भाजपच्या विजयाचा शिल्पकार?
वसंत मोरेंना कात्रजचा घाट दाखवला का?
शुक्रवारी रात्री दोन प्रभाातील निकालाने सगळ्यांनाच श्वास रोखायला लावला. त्यात वसंत मोरे यांचा प्रभागाचाही समावेश होता. तात्यांनी केलेली कामे आणि त्यांची सोशल माडियावर असलेली क्रेझ त्यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकतील असा सगळ्यांनाच विश्वास होता. पण, भाजपचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांनी मोरेंचा पराभव केला.
पुण्याची पसंत मोरे वसंत
महापालिका निवडणुकांपूर्वी मोरेंनी वंचितकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी मोरेंना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी मोरे (Vasant More) यांच्या टॅगलाईन प्रत्येकाच्या बोलण्यात होती. ही टॅगलाईन कोणती होती तर, पुण्याची पसंत मोरे वसंत. परंतु, प्रत्यक्षात जेव्हा अंतिम निकाल आला त्यावेळी बाजी मारली ती, भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी. वसंत मोरेंचा सोशल मीडियावर दबदबा त्यामुळे त्यांचा फॅन फॉलोअर मोरेंना भरभरून मतं देत तारून नेतील असा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात तसे झाले नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील हिरो, वसंत मोरे पुण्याच्या मैदानावर झिरो ठरल्याची चर्चा रंगली होती. मोरेंची सोशल मीडियावर प्रचंड म्हणजे प्रचंड क्रेझ. त्यांची छोटी जरी पोस्ट पडली तरी, त्यावर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो. मात्र, लोकसभेला वसंत तात्यांचा हाती मोठ अपयश आले. त्यांना मिळालेल्या मतांमुळे ते साध त्यांचं डिपॉजिटदेखील वाचवू शकले नाही.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही शिवसेनेची धूळधाण, भाजपचे अतुल सावे कसे ठरले ‘जायंट किलर’
सोशल मीडियाच्या मतदारांनी तारलं पण…
आता पुन्हा महापालिका निवडणुकीत मोरेंना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, जरी सोशल मीडियाला असलेली लाखो फॉलोअर्सच्या फौजेने यावेळी तात्यांना जिंकण्याच्या उद्देशानेच मतदान केले होते. पण, अगदी कमी फरकाने मोरे यांचा पराभव झाला. त्यामुळे विरोधी उमेदवार असलेल्या खोपडे यांना मिळालेली मते बघता मोरे यांचा दारूण पराभव झाला असं म्हणणं चुकीचे ठरेल. कारण, भाजपचे उमेदवार व्यंकोजी खोपडे यांना 21878 मते मिळाली तर, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून मैदानात उतरलेल्या वसंत मोरेंना 20878 मते मिळाली आहेत. याचात अर्थ असा की, मोरे यांचा केवळ एक हजार मतांनी पराभव झालाय. त्यामुळे वसंत मोरेंना कात्रचजा घाट दाखवला असं म्हणणं चुकीचं ठरेल.
13 महापालिका अन् 114 नगरसेवक ; राज्यात MIM ची जोरदार मुसंडी का?
पुणे पालिकेची निवडणूक जशी वसंत तात्यांसाठी महत्त्वाची होती त्याहीपेक्षा ती त्यांचा मुलगा प्रणव याच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. वसंत मोरे प्रभाग 38 मधून तर, त्यांचे चिरंजीव प्रभाग क्रमांक 40 मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. पण, येथे भाजप उमेदवार रंजना टिळेकर यांनी वसंत मोरे यांच्या मुलाला मोठ्या फरकाने परभूत केले. त्यामुळे जरी वसंत मोरेंना मतदारांनी कात्रजचा घाट दाखवला नसला तरी, प्रभाग क्रमांक 40 मधून रूपेश मोरे यांचा पराभव करत टिळेकर यांनी त्यांना एकप्रकारे कात्रजचा घाटच दाखवला आहे.
