PMRDA भरणार तब्बल ‘इतक्या’ जागा… कार्यकारी समितीची मान्यता!

PMRDA भरणार तब्बल ‘इतक्या’ जागा… कार्यकारी समितीची मान्यता!

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (PMRDA) आकृतीबंध व सेवा प्रवेस नियमावलीला कार्यकारी समितीची (Excutive Committee) सोमवार (दि. ३०) मान्यता मिळाली आहे. या आकृतिबंधानुसार प्राधिकरणात ४०७ जागा भरल्या जाणार आहेत. त्यातील १५७ पदे सरळसेवेतून (Direct) भरली जाणार आहेत. उर्वरित जागा पदोन्नतीने प्रतिनियुक्तीने भरल्या जाणार आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्राधिकरणाच्या कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप (Ramdas Jagtap) यांनी सांगितले.

अपर मुख्य सचिव वित्त तथा अध्यक्ष कार्यकारी समिती मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आकृतीबंध व सेवा प्रवेस नियमावलीला मान्यता देण्यात आली. येळी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला, स्नेहल बर्गे , मुख्य अभियंता अशोक भालकर व विवेक खरवडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारा श्रीमती सविता नलावडे उपस्थित होते.

रामदास जगताप यांनी सांगितले की, उप अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक नगर रचनाकार, लिपिक  अशी विविध पदे थेट पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत भरली जाणार आहेत. एकूण ४०७ पदांच्या आकृतीबंधामध्ये १५७ पदे सरळ सेवेने भरली जाणार आहेत. तर उर्वरित पदोन्नतीने व प्रतिनियुक्तीने भरली जातील. तत्कालीन पिंपरी-चिंचवड विकास प्राधिकरणाच्या कर्मचार्‍यांच्या सेवा अखंडित सुरू ठेवण्यात आल्या असून अनुकंपा प्रतीक्षा यादीतील वारसाना विहित पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे (PCNTDA) ४० कर्मचारी कार्यरत असून ५० अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube