उद्योजक आणि कामगार वाचवण्यासाठी गॅसचा राखीव कोटा द्या; पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी

Pimpri Chinchwad Small Industries Association ची मागणी आहे की, उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा उपलब्ध करून द्या

LPG Gas

Provide a reserve quota of gas to save entrepreneurs and workers; Demand of Pimpri Chinchwad Small Industries Association : आखाती देशातील इराण – इस्राईल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे.

Harish Rana : १३ वर्षांचा मूक वनवास संपला; बापानेच मागितलं लेकासाठी ‘इच्छामरणाचं दान’

या युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या औद्योगिक गॅस पूरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे, अन्यथा कारखाने बंद करण्याशिवाय लघु उद्योजकांपुढे दुसरा पर्याय दिसत नाही अशी माहिती पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.

युद्धाचा फटका लग्नसराईला; गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे कॅटरिंग व्यावसायिकांनी ऑर्डर्स थांबवल्या

बुधवारी, पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, संचालक संजय सातव आदी उपस्थित होते. यावेळी उपाध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले की, उद्योजक आणि कामगार वाचविण्यासाठी गॅसचा राखीव कोटा उपलब्ध करून द्यावा अशी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची मागणी आहे.

‘दान नाही सेवा’ पूरग्रस्तांच्या मदतीवरील विधानानंतर अक्षय कुमारनं जिंकली प्रेक्षकांची मनं

सचिव जयंत कड यांनी सांगितले की, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना आवाहन करते की, सर्व प्रकारचे इंधन व गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे. त्यामुळे गॅस व इतर कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे आखाती देशातून येणारे इंधन होय. या इंधनात भारतात येणारा गॅस, सध्या भारतात येणारा गॅस अनिश्चित स्वरूपात येत आहे. त्यामुळे गॅस दर वाढणे चालू झालेले आहे. तसेच औद्योगिक कारणांसाठी लागणारा गॅस पुरवठा अनेक ठिकाणी कमी प्रमाणात तर काही ठिकाणी बंद झालेला आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

मिनिमम बॅलन्सचा फटका! शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांच्या खात्यातून बँकांनी कापले हजारो कोटी

संचालक संजय सातव म्हणाले की, शासनाने तर सध्या औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या गॅसचा पुरवठा पूर्णता थांबविला आहे. कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे इंधन गॅस स्वरूपात वापरले जातात. फॅब्रिकेशन, पावडर कोटींग, सीडी कोटींगसाठी एलपीजी गॅस वापरला जातो. हा गॅस पुरवठा ठप्प झाल्यामुळे पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील जवळपास ७ ते ८ हजार सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांचे दररोज कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे.

नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मुंबईतील मिठी नदीवर करा, पंतप्रधान मोदींवर संजय राऊतांची टीका

या कारणांमुळे औद्योगिक उत्पादनावर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम झालेला आहे. उद्योजक हे आपले उत्पादन वेळेवर तयार करू शकत नाहीत. उत्पादन खर्चात वाढ होत आहे, आपली ऑर्डर वेळेत देऊ शकत नाहीत. त्याचा परिणामाने लघुउद्योजकांना आर्थिक संकटास सामोरे जावे लागत आहे. पिंपरी चिंचवड, तळेगाव, चाकण व रांजणगाव औद्योगिक परिसरातील बरेचसे लघु उद्योजक हे बजाज, महिंद्रा, थरमॅक्स व इतर मोठ्या ऑटोमोबाइल कंपन्यांवर अवलंबून आहेत. हे लघु उद्योजक जाचक जीएसटी, नोटाबंदी, महागाई, कोरोना काळातील लॉक डाऊन, बँकेचे कर्ज, थकलेले हप्ते यातून अजून सावरलेले नाहीत.

मोठी बातमी! दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ला; एका भारतीयासह चार जण जखमी

आता आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या औद्योगिक गॅस पूरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे, अन्यथा कारखाने बंद करण्याशिवाय लघु उद्योजकांपुढे दुसरा पर्याय दिसत नाही. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना आवाहन करते की, सर्व प्रकारचे इंधन व गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे असे आवाहन उपाध्यक्ष संजय जगताप यांनी केले.

follow us