Pune Crime : पहिला प्रियकर सोडणं पडलं महागात!

Pune Crime : पहिला प्रियकर सोडणं पडलं महागात!

पुणे : दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली म्हणून पहिल्या प्रियकराने प्रेयसीची सपासप वार करुन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

‘काडतूस असतो ना काडतूस, तो आत गेल्यावर’.. नारायण राणेंनीही सांगितली काडतुसाची व्याख्या

एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचं एक मुलावर प्रेम होतं पण अचानक तिचं दुसऱ्यावर प्रेम जडलं अन् मग मुलीचे दुसऱ्याच प्रियकराशी प्रेम प्रकरण सुरु झालं. मात्र, या दुसऱ्या प्रेमात अल्पवयीन मुलीला आपला जीव गमवावा लागलायं. पिंपरी चिंचवडमधील घरकुल परिसरातील सांस्कृतिक भवनाच्या छतावर मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.

Bholaa Box Office Collection: अजयच्या ‘भोला’ची छप्परफाड कमाई, सहा दिवसांत ‘इतक्या’ कोटींची उलाढाल

1 एप्रिलच्या रात्री अल्पवयीन मुलगी पहिल्या प्रियकराला भेटण्यासाठी घराबाहेर पडली होती. मात्र, ती रात्र मुलीसाठी अखेरची रात्र ठरली. मुलगी घराबाहेर पडली मात्र, दुसऱ्यादिवसापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या आईवडिलांनी पोलिस ठाणं गाठलं.

पोलिसांत तक्रार मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाली. पोलिसांनी सूत्र हलविल्यानंतर 4 एप्रिलच्या दिवशी अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीवर मृतदेहावर कोयत्याने वार केल्याचं समोर आल्यानंतर ही हत्या असल्याचं निष्पन्न झालं.

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, वकिलांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यास सूट

तपास सुरु असताना मुलीची हत्या झाल्याचं आणि दोन अल्पवयीन मुलांनीच तिची हत्या केल्याचं तपासात समोर आलं. यातील एका अल्पवयीन मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. मात्र, ती दुसऱ्याच्या प्रेमात पडली होती. त्यात आधीच तिच्याशी असणाऱ्या प्रेमसंबधातून त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा ही दाखल झाला होता.

याच रागातून त्याने मित्राच्या मदतीने हे कृत्य केलं. चिखली पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आहे. मृत मुलीच्या आईने हत्या करणाऱ्यांवर कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, प्रियकरासोबत त्याच्या एका मित्रालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मुलीची हत्या का केली? याबाबत अधिक तपास सुरु आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube