Pune Crime: पुणे हादरले! प्रियकराच्या मदतीने आईनेच लेकीचे अश्लील व्हिडिओ काढून केले व्हायरल

Pune Crime News : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. आताही पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि लाजीरवाणी घटना समोर आली. आता एका आईनेच आपल्या मुलीसोबत संतापजनक कृत्य केलं. प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून हे व्हिडिओ व्हायरल केले. मुलीला आपले प्रेमसंबंधाबद्दल माहिती पडल्याने आणि त्याची वाच्यता तिने बाहेर केल्याच्या रागातून आईने हे कृत्य केलंय. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी नराधम आईसह तिच्या प्रियकरालाही बेड्या ठोकल्या आहेत.
बाबासाहेबांचे विचार सर्वदुर पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा;अजितदादांकडून डॉ. आंबेडकरांना अभिवादन
प्राप्त माहिती अशी की, मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणारी ही महिला आपल्या अल्पवयीन मुलीसोबत बिबवेवाडी परिसरात राहत होती. या महिलेचे गुरुदेव स्वामी नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळले होते. आणि लेकीला आईच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती पडले होते. यामुळे ते उघड करण्याच्या तयारीत लेक होती. तिने याबद्दल त्यांच्या घरमालकीणीलाही सांगितले. त्या गोष्टीचा आईन मनात राग धरला होता. त्यामुळंच नराधम आईने तिच्या मुलीचे नको त्या स्थितीत व्हिडिओ काढले.
विरोधकांकडून वक्फच्या नावाखाली लोकांना भडवले जातेय, मुर्शिदाबाद हिंसाचारावरून CM योगींचा निशाणा
यासाठी आपल्या प्रियकराला लेकीसोबत अश्लील संबंध ठेवायला सांगितलं आणि व्हिडिओ शुट केले. इतकंच नाही तर या आईने आपल्या लेकीचे हे अश्लील व्हिडीओ आपल्या नातेवाईकांना पाठवून तिची बदनामी केली. शनिवारी ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, मुलीचे व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आई आणि तिचा प्रियकर दोघेही पसार झाले होते. मात्र, बिबेवाडी पोलिसांनी विकृत आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, अल्पवयीन मुलीने आईचे आणि तिच्या प्रियकराचे प्रेमसंबंध त्यांच्या घरमालकीणीला सांगितल्यानं नराधम आईने हे कृत्य केल्याचं समोर आलं.