कोल्ड कॉफीत गुंगीचे औषध टाकत… मैत्रिणीच्या घरात दरोडा, पुण्यातील धक्कादायक घटना

Robbery At Friends House Giving Sedative in cold coffee In Pune : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीच्या घरावर दरोडा (Robbery At Friends House) टाकल्याचं समोर आलंय. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेविषयी आपण सविस्तर (Pune Crime) जाणून घेऊ या.
तक्रारदार आणि आरोपी या दोघी मैत्रिणी होत्या. लग्नाआधी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी त्या सदाशिव पेठेत एकाच रूमवर राहायच्या. काही काळानंतर दोघींचीही लग्न झाली. त्यातील एक आंबेगाव बुद्रुक परिसरातील निर्माण (Crime News) विवा सोसायटीत तर दुसरी आंबेगाव पठार परिसरातील एमराइड सोसायटीत वास्तव्यास होत्या. लग्नानंतर दोघीजणी अनेक वर्षानंतर मार्च आणि एप्रिल महिन्यात भेटल्या. म्हणजे एक जण दुसरीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली. मात्र, जाताना सोबत कोल्ड कॉफी घेऊन गेली. मात्र घरी जाणाऱ्या या मैत्रिणीचे इरादे काही ठीक नव्हते.. कारण सोबत घेऊन गेलेल्या कोल्ड कॉफीत गुंगीचं औषध होतं.
खळबळजनक! मनसेच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन
दोघी बसल्या, गप्पा मारल्या. तर दुसरी कोल्ड कॉफी प्यायली. नंतर हळूहळू ती बेशुद्ध झाली. त्यानंतर दुसरीने मात्र आपल्याच मैत्रिणीचं घर साफ केलं. कपाटात ठेवलेले तब्बल सहा लाखाचे दागिने घेऊन ही मैत्री निघून गेली. त्यानंतर आणखी महिनाभरनंतर ही मैत्रीण आली. सोबत कोल्ड कॉफी होतीच. दोघी भेटल्या गप्पा ही मारल्या. कोल्ड कॉफी पिल्यानंतर ही हळूहळू बेशुद्ध होत गेली. यावेळेस मात्र ही मैत्रीण गेल्यानंतर दुसरीला काहीतरी गडबड वाटली. तिने घराची झाडाझडती घेतली. कपाट चेक केलं. तेव्हा मात्र तिने कपाळावर हात मारून घेतला. कपाटातील दागिने चोरीला गेले होते. मग मात्र तिने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या पाच मोठ्या घोषणा कोणत्या? वाचा एका क्लिकवर….
पुणे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी म्हटलंय की, पोलिसांनी गुन्हा दाखल करून या पंचवीस वर्षाच्या मैत्रिणीला अटक केली. तिने चोरलेले दागिनेही पोलिसांनी जप्त केले. पोलिसांच्या तपासात या चोरट्या मैत्रिणीला ऑनलाइन गेमिंगचा नाद असल्याचं निष्पन्न झालं. त्यातूनच तिने असे प्रकार करायला सुरुवात केल्याचे समोर आलंय. मात्र, मैत्रिणीने मैत्रिणीलाच कोल्ड कॉफीतून गुंगीचं औषध देऊन केलेला हा प्रकार पुण्यात चर्चेचा विषय ठरत आहे.