पुण्यात पुन्हा एकदा बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ! एका दिवसात २९० दस्त…

पुण्यात पुन्हा एकदा बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ! एका दिवसात २९० दस्त…

Pune Registrar Office : राज्य शासनाची दिशाभूल करीत बोगस दस्त नोंदणीचा धुमाकूळ सुरू आहे. एकाच दिवशी २९० अनधिकृत सदनिकेचे दस्त नंबरला लावले होते आणि नोंदणी करण्याचे ठरवित, ठराविक एजंट वकिलांना सांगितले. त्यामुळे सह दुय्यय निबंधक अभिजीत विधाते यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

रोहन सुरवसे-पाटील म्हणाले की, सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक-३ या ठिकाणी सह दुय्यम निबंधक अभिजीत विधाते यांनी एकाच दिवशी नियोजित योजना करून गुरुवारी (दि. १३) या दिवशी २९० अनधिकृत सदनिकेचे दस्त नंबरला लावले होते आणि नोंदणी करण्याचे ठरवित, ठराविक एजंट वकिलांना सांगितले. त्याप्रमाणे गुरुवार सकाळपासून कोविड नियम धाब्यावर बसवून, तब्बल १००० हून अधिक लोकांची गर्दी होती आणि बोगस दस्त नोंदणी केल्याची माहिती मिळाली.

शिंदे जाणार … अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत? – Letsupp

सामान्य नागरिक विना अन्न-पाणी हवेली क्रमांक तीनच्या आवारात सकाळ पासून बसून होते. ठरल्याप्रमाणे २० ते ३० दस्तांच्या एक व दोन नंबर शिक्का पावती होऊन आले. परंतु, नोंदणी प्रक्रियेप्रमाणे दस्त पूर्ण न करता नोंदणी कायद्याचा भंग करून अनाधिकृत सदनिकेचे दस्त नोंदणी नोंदवले गेले. तसेच सर्व सामान्य नागरिकांना वेठीस धरून व सर्व नियम धाब्यावर बसवत यांनी राज्य शासनाचा महसूल बुडवून दस्त नोंदणी केली.

या नोंदणी प्रकियत ४५ मिनिटांत एक दस्त पूर्ण होऊन दुसरा दस्त नोंदवण्यासाठी घेणे होते. परंतु, इथे एकाच वेळी ३० दस्तांच्या पावत्या करण्यात आल्या. पंरतु, फोटो प्रकीया पूर्ण करण्यात आलीच नाही. आपला शासकीय वेळ कार्यालय पूर्ण न करता चार वाजता सर्व दस्त बेकायदेशीर नोंदवले व एजंट सोबत आपले कार्यालय सोडून पळून गेले. यामधील संशयित संबंधितांनी देवाण-घेवाण केल्याशिवाय या प्रकारचे दस्त नोंदणी झाले आहेत, असे वाटते. या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत तातडीने संबंधितावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी रोहन सुरवसे-पाटील यांनी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube