ब्रेकिंग : पुणे जैन बोर्डिंग जमीनीबाबत धर्मदाय आयुक्तांचे ‘स्टेटस्को’ ठेवण्याचे आदेश
Pune Jain Boarding Land Sale जैन बोर्डिंग व्यवहारात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे.

Pune Jain Boarding Land Sale Charity Commissioner Issues Status Quo Order : पुण्यातील मॉडेल कॉलनीच्या परिसरातील ‘जैन बोर्डिंग हॉस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरुन वातावरण ढवळून निघालेलं असताना आता धर्मदाय आयुक्तांनी पुणे जैन बोर्डिंग जमीन (Jain Bording Hoste) व्यवहाराबाबत मोठा निर्णय दिला आहे. आतापर्यंत जे व्यवहार झाले ते ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिले आहेत. एचएनडी जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील याचिकेवर आज (दि.20) सुनावणी झाली. त्यात धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर वरील आदेश दिले आहेत. तसेच जैन बोर्डिंगच्या आवारात मंदिर आहे की नाही याची पाहणी करावी, असे निर्देश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा शिवाजी नगर येथे आहे. जिथे दिगंबर जैन बोर्डिंग आणि शेतंबर जैन बोर्डिंग आहे. 1958 साली हिराचंद नेमचंद दोषी यांनी या वसतीगृहाची उभारणी केली होती. ही जागा काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास करण्यास इच्छूक होते. तर, समाजातील काही लोकांनी याला विरोध केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करुन तिची विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात आहे. पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी या जागा विक्रीला मंजुरी देताना सर्व नियम, कायद्यांची पायमल्ली केली. या जमीनविक्रीच्या व्यवहाराशी संबंध असलेल्या गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा इथल्या नेत्यांशी लागेबांधे असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी जोरदार प्रहार केला आहे. पुण्यातील मोक्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून वादाच्या केंद्रस्थानी काही नेते असल्याचं उल्लेख त्यांनी केला आहे. बिल्डर आणि काही नेत्यांनी मिळून जागा विकल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्ष घालू भूमिकेवरून चांगलाचा समाचार घेतलाय. आम्हाला आश्वासनाची गरज नाही. हा व्यवहार रद्द झाल्याची ऑर्डर आल्यानंतर विश्वास ठेवू, फडणवीसांनी सकारात्मक पाऊल टाकलं यासाठी आभार.दिवाळीनंतर स्थगिती आदेश घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्याला यावं, आम्ही त्यांचा सत्कार करू . अन्यथा आमचा लढा सुरुच राहील असंही ते म्हणाले.
अजित पवारांनी सावध रहावं अन्यथा…., छगन भुजबळांचं नाव घेत जरांगे पाटील असं का म्हणाले?
मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण
जैन बोर्डिंग व्यवहारात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. याबाबत खळबळ उडाल्यानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्वतःच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी यांनी ( Raju Shetty Allegations) काही आरोप केले, पण ते सत्य परिस्थितीशी जुळत नाहीत. मी पुणेकरांच्या (Pune News) विश्वासासाठी स्पष्ट करतो की, मी जैन बोर्डिंग हाऊस व्यवहारात सहभागी नव्हतो, असं मोहोळ यांनी सांगितलं. मी गोखले बिल्डरचा पार्टनर आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात सर्वकाही माहिती दिली असल्याचं देखील मोहोळ यांनी स्पष्ट केलंय. Pune Jain B0oarding Land Sale Charity Commissioner Issues Status Quo Order
मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले की, गोखले बिल्डरसोबतचे एलएलपी (Jain Barding Land Case) प्रकल्पात त्यांचा सहभाग फक्त 2023 मध्येच होता. 25 नोव्हेंबर 2024 रोजी ते दोन्ही एलएलपी मधून बाहेर पडले. माझा या व्यवहाराशी कोणताही संबंध 2024 नंतर नाही. जैन बोर्डिंग हाऊसची खरेदी आणि विक्री गोखले एलएलपी द्वारेच झाली असून माझे नाव त्या व्यवहारात नाही, असं मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केलंय.
Video : शनिवारवाड्यासमोर नमाज पढण्याचा कथित व्हिडीओ व्हायरल?, घटनेने पुण्यात मोठी खळबळ
जैन बांधवांशी संवाद
मोहोळ यांनी पुढे म्हटले की, जैन बांधवांशी त्यांचा संवाद सुरू असून, त्यांना मदत करायची असल्यास ते तत्पर आहेत. मी पुणेकरांचा लोकप्रतिनिधी आहे, कोणत्या भागीदारीत राहता येईल किंवा नाही, याचे नियम मी पाळतो. या प्रकरणात कोणताही गैरसमज न राहावा, म्हणून स्पष्ट करतो, असे त्यांनी नमूद केले. अखेर, केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी ही प्रकरणाची माहिती सर्व संबंधितांना देण्याची तयारी असल्याचे सांगितले आणि कोणताही प्रश्न असल्यास योग्य तपासणी करण्यासाठी खुली भूमिका ठेवली.
धर्मदाय आयुक्तांचे आदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा