Nilesh Rane : पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई…

Nilesh Rane : पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्तेवर पालिकेची कारवाई…

Action on Nilesh Rane Property: पुण्यात निलेश राणेंच्या (Nilesh Rane ) मालमत्तेवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. डेक्कन भागात असलेल्या आर डेक्कन येथील व्यवसायिक जागेचा कर न भरल्याने जागा सील केल्याची माहिती मिळत आहे. मालमत्ता थकबाकीप्रकरणी महापालिकेच्या (Municipal Corporation) अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे.

तब्बल तीन कोटी 77 लाख 53 हजार रुपयांची थकबाकी होती. पुण्यात अनेकांनी मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळे सध्या महापालिकेकडून कर वसुली केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पुण्यातील अनेकांनी मालमत्ता कर थकवला आहे. त्यामुळे महापालिकेकडून कर वसुली केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळातील व्यक्तींनाही चांगलाच मोठा झटका सहन करावा लागत आहे. पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून थकबाकी वसुलीवर मोठा भर दिला जात आहे. पाच पथकांद्वारे पुणे शहराच्या अनेक विविध भागात थकबाकी न भरणाऱ्या व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली जात आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये ‘हायव्होल्टेज ड्रामा’ : 6 आमदारांनी सोडली काँग्रेसची साथ, CM सुख्खूंचा राजीनामा

अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप म्हणाले की, ‘‘आज दिवसभरात एकूण 16 मिळकती सील करून 8 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. त्यापैकी मॉलमधील हॉटेलची 3 कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी असल्याने हॉटेल सील केले आहे. मात्र काही जणांनी अद्याप रक्कम भरलेली नाही.’’ दरम्यान, महापालिकेच्या पथकाने हॉटेल सील केले, तो पर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना ही मिळकत कोणाची आहे याची काहीच माहिती नव्हती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube