LetsUpp Special : भारतीय नारी सब पे भारी! पुणे मेट्रोचे ‘सारथ्य’ सात तरुणींच्या हाती…
भारतात रेल्वे सुरु झाल्यानंतर रेल्वेचे सारथ्य पुरुषांच्याच हाती आपण पाहिलं पण पुण्यात सुरु झालेल्या मेट्रो ट्रेनचं सारथ्य सात तरुणींच्या हाती आहे. या सात तरुणींचं पायलटचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून मेट्रो ट्रेन चालवित आहे.
दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा झुल्फिकार बडोदावाला 11 ऑगस्टपर्यंत ATS कोठडीत
दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट दरम्यान मेट्रोची सेवा सुरू झालीयं. मेट्रो ट्रेनच्या चालकांसाठी एकूण 54 ट्रेन पायलट आहेत. त्यामध्ये 7 तरुणींचा समावेश असून या तरुणींना पुण्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे.
मंत्र्याचं नाव छापलं नाही, आमंत्रणही दिलं नाही दोन अधिकाऱ्यांना मिळाली ‘जबर’ शिक्षा
पायलट शर्मिन शेख यांनी लेटस्अपशी बोलताना आपली भावना व्यक्त केली असून मला सायकलही चालवत येत नाही पण आता मी आता मेट्रो ट्रेन चालवत असल्याने कुटुंबियांना अभिमान वाटत आहे. तसचे एक मुलगी मेट्रो ट्रेन चालवत असल्याने प्रवाशांकडून कौतुक होत असल्याचं शेख यांनी सांगितलं आहे.
बिलाला विरोध केला तरीही ‘आप’ तुम्हाला.., केंद्रीय मंत्री अमित शाहांचा काँग्रेसला सल्ला
तसेच पायलट प्रतीक्षा माटे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून त्या म्हणाल्या, माझ्यासाठी ही नवीन नोकरी असून आपण ट्रेन चालवू शकतो असं कधीच वाटलं नव्हत. आम्ही ट्रेन चालवतो ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचं माटे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, मेट्रोच्या ताफ्यात एकूण ५४ ट्रेन पायलट आहेत. त्यामध्ये सात महिलांचा समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता या सात तरुणी मेट्रो चालवण्यास सज्ज झाल्या असून पंतप्रधान मोदी झेंडा दाखविणाऱ्या मेट्रोचे सारथ्यदेखील एक महिलेनेच केले आहे.