समाज सुधारण्यासाठी दृष्टी आणि दृष्टिकोन महत्वाचा : जान्हवी धारीवाल बालन

रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन द्वारा आयोजीत शोभाताई आर धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

Shobhatai Dhariwal

vision and attitude are important for improving society: Janhvi Dhariwal Balan’s assertion : रसिकलाल माणिकचंद धारिवाल फाऊंडेशन द्वारा आयोजीत शोभाताई आर धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त एचव्ही देसाई आय हॉस्पिटल येथे मोफत नेत्र तपासणी, 501 मोतीबिंदू रुग्णांच्या तपासणी व शस्त्रक्रिया, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप, रक्तदान शिबीर व आर एम डी इंग्रजी शाळा कोंढवा, लोणीधामणी गाव, कासारी गाव, नवलेवाडी पिंपरी पेंढार या गावांमध्ये वृक्षारोपण असे असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, फाउंडेशनच्य उपाध्यक्षा शोभाताई धारिवाल यांनी 13.63 रुपये निधीचा धनादेश दिला. एचव्ही देसाई आय हॉस्पिटलचे सचिव नितीन देसाई यांनी हा धनादेश स्वीकारला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी शोभाताई आर. धारीवाल उपाध्यक्षा, जान्हवी धारीवाल बालन अध्यक्षा, आरएमडी फाऊंडेशन , नितीनभाई देसाई विश्वस्त एचव्ही देसाई आय हॉस्पिटल, इंद्राणी बालन फाऊंडेशन व बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, परवेज बिलिमोरिया कार्यकारी संचालक तसेच रुग्णालयाचा कर्मचारी वर्ग व शिकावू विद्यार्थी, विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंगळवारी पुण्यात युगांतर 2047 चे आयोजन; पुनित बालन ग्रुप, सैन्य भरती विभागाचा उपक्रम

या प्रसंगी जान्हवी धारीवाल बालन यांनी रसिकशेठ धारीवाल यांनी आर एम डी फाऊंडेशनची स्थापना करून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना यामध्ये मोफत गुजरात राज्यातील कॅन्सर हॉस्पिटल, ससून पुणे येथील सर्व सोयीयुक्त अपघात रुग्णालय , नाशिक येथील आर एम डी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर , पूना हॉस्पिटल येथे कार्डीयाक कक्ष , तसेच शिक्षण क्षेत्रात फार्मसी, व्यवस्थापन, अभियांत्रिकी महाविद्यालय सोबतच इंग्रजी शाळांची स्थापना , हुशार व गरजू विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती, पर्यावरण क्षेत्रात खडवासला धरणाचा गाळ काढून पाण्याचा स्तर वाढविणे , शेकऱ्यांसाठी बंधारे बांधणे इत्यादी समाजपयोगी कामं केली. हे सर्व प्रकल्प आखतांना आई शोभाताई यांचा सिंहाचा वाटा असे अशी माहिती दिली.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. पुनीत बालन यांनी समाजाचे ऋण फेडतांना कमाईतील वाटा समाजासाठी खर्च करणे हि सामाजिक जबाबदारी असून आज शोभाताईच्या जन्मदिनानिमित्त नक्कीच हॉस्पिटल च्या कार्यात आमचाही सहभाग असेल असे आश्वासन दिले.त्यानंतर फाऊंडेशनद्वारा प्रायोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा धनादेश व शिष्यवृत्तीच्या विध्यार्थ्यांचे धनादेश वाटप करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

पुनित बालन ग्रुपचा पुढाकार! ‘फ्रेंडशिप करंडक’ निमित्त पुणे पोलिस कल्याण निधीला 5 लाखांची देणगी

follow us