पुणे-नगर रोडवर दोन PMPML बस समोरासमोर धडकून अपघात; अनेकांना काचा फोडून काढले बाहेर

पुणे-नगर रोडवर दोन PMPML बस समोरासमोर धडकून अपघात; अनेकांना काचा फोडून काढले बाहेर

Pune PMPML Accident : पुण्याची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या पुणे महानगर पालिकेच्या दोन पीएमपीएमपीएलचा समोरासमोर धडकून अपघात झाला. यामध्ये 29 प्रवासी जखमी झाले आहेत. तर अनेकांना अक्षरशः काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यात आले. हा अपघात पुणे अहमदनगर मार्गावर झाला. ( Pune PMPML Accident on Pune Nagar Road 29 traveler injured )

‘द केरळ स्टोरी’नंतर आता अदाची नवी वेब सीरिज चाहत्यांच्या भेटीला; ‘Commando’चा ट्रेलर प्रदर्शित 

कसा झाला अपघात?
पुणे-अहमदनगर मार्गावर असणाऱ्या बीआरटी मार्गावर या दोन पीएमपीएमपीएल इलेक्ट्रीक बसची समोरासमोर धडक झाली. यामध्ये 29 प्रवाशी जखमी झाले. चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एक बस ही वाघोली आगाराची होती. ती कात्रजहून वाघोलीकडे जात होती. तर दुसरी बस ही नतावाडी आगाराची होती. ती तळेगाव ढमढेरेहून मनपाल जात होती. या बस सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास एकमेकींना समोरासमोर धडकल्या.

संभाजी भिडेवर कारवाई का होत नाही? काँग्रेस नेत्यानं दिलं धक्कादायक उत्तर

या अपघातानंतर अनेकांना अक्षरशः काचा फोडून बसच्या बाहेर काढण्यात आले. तर या घटनेची महिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. जखमींना ससून रूगणालयात दाखल करण्यात आले. यामध्ये 8 महिला, दोन्ही बसचे चालक आणि वाहक तसेच इतर प्रवाशांचा समावेश आहे. मात्र हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे घडला हे समोर येऊ शकलेले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube