Pune Politics : पुणे शहराध्यक्ष पदासाठी मतदान, ‘ही’ नावे आघाडीवर, महिला सदस्याला मिळणार संधी?

पुणे : भाजपमध्ये (BJP) संघटनात्मक बदलाची प्रक्रिया जोरात सुरु आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत मोठे बदल पाहायला मिळत आहेत. आता पुणे शहराध्यक्ष (Pune BJP) पदासाठी देखील मतदान प्रक्रिया राबविण्यात आली असून पुण्यातील नव्या शहराध्यक्षपदासाठी काही नावे चर्चेत आहेत.
विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य म्हणजे असंवेदनशीलतेचा अन् देशविरोधी मानसिकतेचा कळस -बावनकुळे
रविवारी (ता. 27 एप्रिल) भाजप प्रदेश पर्यवेक्षक धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि निरीक्षक शेखर इनामदार यांच्या उपस्थितीत मतदान घेण्यात आले. यामध्ये शहराध्यक्षपदासाठी योग्य असलेल्या तिघांची नावे विचारण्यात आली. यामध्ये खास बाब म्हणजे या तिघांमध्ये एक महिला सदस्य असावी, अशी अट ठेवण्यात आली होती.
पुणे शहरात भाजपच्या विविध मोर्चा, प्रदेश आणि शहरस्तरीय पदाधिकारी, तसेच माजी आमदार, खासदार आणि अन्य वरिष्ठ कार्यकर्त्यांनी नवीन शहराध्यक्षपदासाठी आपली तीन नावे सुचवली आहेत. या अहवालावर चर्चा करून एक नाव निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Sonali Khare : सोनाली खरेच्या बोल्ड अदा, चाहते झाले फिदा
दरम्यान, पदाधिकाऱ्यांकडून शहराध्यक्षपदासाठी मतदान प्रक्रिया सुरू असल्याने, इच्छुकांनी मतदारांना फोन, मेसेजद्वारे आपल्याला पाठिंबा देण्यासाठी मतदारांना गळ घातली. यामुळे ही शहराध्यक्ष निवड प्रक्रिया चुरशीची होताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, शहराध्यक्ष पदासाठी महिला सदस्यांची अट असल्याने माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे, आणि वर्षा डहाळे यांची नावे चर्चेत आहेत.
अशा परिस्थितीत, सध्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राजेंद्र शेळीकर, गणेश घोष, आणि राजेश पांडे यांच्या नावे आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची मोठी चर्चा रंगताना दिसत आहे. दरम्यान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, चर्चेत कुणाची आणि कितीही नाव असली तरी भाजप हा कधी कुठला निर्णय घेईल, याचा काही भरोसा नाही. त्यामुळे चर्चेत असलेले नाव पुणे शहर अध्यक्षपदी निवडले जाईल, अशा चर्चा जरी होत असल्या तरी ऐनवेळी नवीन चेहऱ्याला देखील संधी दिली जाऊ शकते, ही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी काळात पुणे शहराला भाजपचा कारभारी कोण मिळणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.