Pune Accident : वाढदिवसाला बाबांना सरप्राईज द्यायचं ‘ती’चं स्वप्नच अपूर्णच; आश्विनीच्या आईचा टाहो…
Pune Accident News : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत तरुण-तरुणीला चिरडलं (Pune Accident News). या दुर्देवी घटनेनंतर मृत तरुणी आश्विनी कोस्टाच्या (Ashwini Kosta) आईने ससूनमध्ये तिचा मृतदेह पाहताच टाहो फोडला. आश्विनी 18 जूनला तिच्या वडिलांच्या वाढदिवसाला येऊन सरप्राईज देणार होती, असं टाहो फोडत आश्विनीच्या आईने सांगितलं आहे.
400 चा आकडा गाठला नाही तरी… भाजपच्या जागांबाबत प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये बांधकाम व्यवसायिकाचा अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवालने तरुण-तरुणीला कारने उडवले. या अपघातात वेदांत याची कार एवढ्या भरधाव वेगात होती की, कारची या तरुण-तरुणीच्या दुचाकीला धडक बसताच अश्विनी उडून रक्ताच्या थारोळ्यात पडली. तर तरुण अनिस अवधिया हा दुचाकीवरच फरफटत पुढे गेला. या घटनेत अश्विनीचा जागीच मृत्यु तर अनिसचा रुग्णालयात मृत्यू झालायं.
दरम्यान, अश्विनी कोस्टा हीचं वर्क फ्रॉम होम सुरु होतं, अपघात घडण्यापूर्वी आश्विनीचं तिच्या आईसोबत फोनद्वारे बोलणं झालं होतं. वर्क फ्रॉर्म होम सुरु असल्याने तू जरा बाहेर फिरुन ये, रिफ्रेश होशील असा सल्ला तिच्या आईने दिला होता. त्यानंतर आश्विनी तिच्या मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बाहेर आली होती. आईने सल्ला दिला खरा पण तिने विचारही केला नसेल की हा सल्ला आपल्या मुलीला कायमचं हिरावून घेईल. अश्विनीच्या वडिलांचा 18 जूनला वाढदिवस होता. या दिवशी ती जबलपूरला वडिलांना सरप्राईज देण्यासाठी येणार होती. याबाबत तिच्या वडिलांना माहिती नव्हती, असं आश्विनीच्या आईने यावेळी सांगितलं आहे.
Mirzapur 3 OTT: ‘मिर्झापूर 3’ ची प्रतीक्षा लवकरच संपणार? ‘त्या’ पोस्टने वाढवली चाहत्यांची उत्सुकता
अश्विनीचं शिक्षण पुण्यातील वाडिया महाविद्यालयात झालं होतं. ती एक इंजिनिअर होती, पुण्याती ती नोकरी करीत होती. मूळची ती मध्य प्रदेशातील जबलपूरची होती. अश्विनी माझी लहान बहिण होती. तिच्या जाण्याने मी आता एकटा पडलो आहे, तिच्यासोबत वडिल रोज फोनवर बोलायचे. पार्टीसाठी बाहेर जात असल्याचं सांगितल्यानंतर लगेचच ही बातमी समोर आली होती. तिच्याच मोबाईलवरुन आम्हाला फोन आलेला. हा फोन तिच्या मित्राने केला असल्याचं अश्विनीच्या भावाने सांगितलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
प्रसिद्ध बिल्डर ब्रह्मा कॉर्पोरेशनचे विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांत याने अत्यंत बेदरकारपणे आलिशान कार चालवत रस्त्यावरील वाहनांना धडक दिली. यामध्ये दोघेजण चिरडले गेले. शनिवारी मध्यरात्री हा भीषण कल्याणनगर येथे अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवर असलेली तरुणी हवेत उडाली आणि त्यानंतर जमीनीवर आदळून तिचा जागीच मृत्यू झाला. अश्विनी कोस्टा असं मृत तरुणीचं नावं आहे. तर अपघातात जमखी झालेले अनीस अवलिया यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.