पुणे जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने पकडले रंगेहाथ! प्रकरण काय?

Pune Zilla Parishad officers caught red-handed by the Corruption Department : अनेकदा सर्वसामान्यांसह मोठ्यास्तरावरील लोकांना देखील आपल्या कामांसाठी लाचेची मागणी केली जाते. असा एक प्रकार पुण्यातील जिल्हा परिषदेमध्ये घडला आहे. कारण पुणे जिल्हा परिषदेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिलं काढण्यासाठी कांत्राटदारांना लाचेची मागणी केली होती. त्यानंतर या अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
नेमकं काय झालं?
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांच्यासह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिलं काढण्यासाठी कांत्राटदारांना लाचेची मागणी केली होती. यामध्ये कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार (वय 57 वर्षे), उपअभियंता दत्तात्रय भगवानराव पठारे (वय 57 वर्षे), आणि कनिष्ठ अभियंत्या अंजली प्रमोद बगाडे यांचा समावेश आहे.
ग्राहकांनो, महिंद्रा थार, स्कॉर्पिओ एनवर बंपर सूट, होणार तब्बल 1.5 लाखांची बचत
या अधिकाऱ्यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून कंत्राटदाराला त्याच्या झालेल्या कामांची बिलं काढून हवी असतील तर मिळणार असलेल्या एकुण रक्कमेच्या 2 टक्के रक्कम आपल्याला दिली जावी अशी मागणी केली होती. त्यानुसार या कंत्राटदाराने या तीन अधिकाऱ्यांना 1 लाख 42 हजार रूपये देऊ करत असताना या अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाना पटोलेंच्या ऑफरवर एकनाथ शिंदे यांची पहिलीच प्रतिक्रिया, ‘भगव्या रंगात न्हाऊन …’
दरम्यान या प्रकरणानंतर पोलिसांकडून नागरिकांना अशा प्रकारे लाच मागितली गेली असल्यास एका हेल्पालाईन नंबरवर संपर्क करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. यासाठी खालील संपर्क क्रमांक, ईमेल आणि तक्रार अॅप देखील देण्यात आले आहे.
– पुणे दुरध्वनी क्रमांक – (020) 26122134, 26132802, 26050423.
– व्हॉट्सअॅप क्रमांक – 993099770
– ई-मेल – dyspacbpune@mahapolice.gov.in
– वेबसाईट – www.achmaharashtra.gov.in
– तक्रार अॅप – www.achmaharashtra.net.in.