Chinchwad ByElection; राहुल कलाटे यांनी अर्ज नेला आणि भाजपची धाकधूक वाढली

Chinchwad ByElection; राहुल कलाटे यांनी अर्ज नेला आणि भाजपची धाकधूक वाढली

चिंचवड : भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll Election) दिवसेंदिवस इच्छुकांची संख्या वाढतीय. भाजप आणि महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच दिसून येतीय. अशात शिवसेना नेते राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी देखील या निवडणुकीत उडी घेतलीय.

राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज घेतला आहे. आणि तोही दुसऱ्याच्या नावाने अर्ज घेतला आहे. त्यामुळे कलाटे 2019 ची पुनरावृत्ती करण्याची शक्यता आहे. कलाटे यांनी स्वतःसाठी दोन पर्याय खुले ठेवले आहेत. त्यांनी घेतलेल्या उमेदवारी अर्जामुळे सगळीकडे जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला जागा सुटल्यास पक्षाच्या चिन्हावर निवडूक लढवणार. तिढा सुटलाच नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कलाटे यांच्या या खेळीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आणखी रंगत आणली आहे.

राहुल कलाटे म्हणाले की, मी 2014 आणि 2019 मध्ये चिंचवडच्या जनतेसमोर उमेदवार म्हणून गेलो आहे. मात्र जर महाविकास आघाडीने जनतेचं काम केलं तर त्यांच्याकडून मी जनतेसमोर जाणार आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. मात्र शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी बंडखोरी करुन भाजपच्या लक्ष्मण जगतापांसमोर आव्हान उभं केलं होतं.आता कलाटे पुन्हा तीच खेळी करण्याच्या दिशेने पावलं टाकत आहेत.

महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप निश्चित झालं नाही आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube