राम वाकडकर व चेतन भुजबळ यांचा सोसायटी, गाठीभेटींचा झंजावती दौरा

PCMC Election 2026 : अनेक सोसायटीतील नागरिकांनी भाजप उमेदवारांच्या कामकाजावर विश्वास व्यक्त करत जाहीर पाठिंबा दर्शविला.

  • Written By: Published:
Rahul Kalate Pcmc

PCMC Election 2026 : पिंपरी चिंचवड (PCMC Election 2026) महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 25 (वाकड–ताथवडे–पुनावळे) मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला जोरदार गती मिळाली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate), श्रुती राम वाकडकर, रेश्मा चेतन भुजबळ आणि कुणाल वैजनाथ वाव्हळकर यांच्या प्रचारार्थ भाजपाचे शहर उपाध्यक्ष राम वाकडकर व ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष चेतन भुजबळ यांनी परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये झंजावती गाठीभेटींचा दौरा करुन प्रचाराची सांगता करण्यात आली.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य सुविधा, उद्याने, ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या प्रश्नांवर नागरिकांनी मनमोकळेपणाने आपली मते मांडली. प्रभागाचा विकास साधलेले राहुल दादा कलाटेंसारखे व्हिजनरी नेते तसेच श्रुती वाकडकर रेश्मा भुजबळ व कुणा वाव्हळकर ह्या सर्व भाजप उमेदवारांच्या माध्यमातून विकासाभिमुख, पारदर्शक आणि जनतेच्या हिताचे काम निश्चित केले जाईल, असा विश्वास राम वाकडकर व चेतन भुजबळ यांनी दिला.

या गाठीभेटींना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक सोसायटीतील नागरिकांनी भाजप उमेदवारांच्या कामकाजावर विश्वास व्यक्त करत जाहीर पाठिंबा दर्शविला. सर्वसामान्य नागरिकांपासून ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्गापर्यंत या प्रचार दौऱ्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपच्या उमेदवारांची पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

भाजप म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर सेवा, विकास आणि विश्वासाचे प्रतीक आहे. प्रभाग क्रमांक २५ चा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे,”
पुढील काळात राहुलदादा कलाटे यांच्या मार्गदर्शनात सर्वच उमेदवार प्रभागाचा नक्कीच कायापालट करतील त्यामुळे कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपच्या पॅनलला बहुमताने विजयी करा, असे आवाहन भाजपा शहर उपाध्यक्ष राम वाकडकर यांनी केलेय.

प्रभाग क्रमांक २५ व जनतेच्या हितासाठी भाजपा पॅनलमधील सर्वच उमेदवारांनी गेली अनेक वर्षे सर्वच स्तरावर भरीव योगदान दिले आहे. येत्या काळातही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वप्नातील २५ हा आदर्श प्रभाग करण्यासाठी कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनात व राहुलदादा कलाटे यांच्या नेतृत्वातील हे पॅनल अनमोल योगदान देणार हे निश्चित असे, भाजपा ओबोसी सेल अध्यक्ष चेतन भुजबळ यांनी म्हटलंय.

follow us