Pune News : आयुष प्रसाद यांची बदली! आर.एस. चव्हाण जिल्हा परिषदेचे नवे सीईओ…

Pune News : आयुष प्रसाद यांची बदली! आर.एस. चव्हाण जिल्हा परिषदेचे नवे सीईओ…

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. आयुष प्रसाद यांच्या जागी आता आर. एस. चव्हाण पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत. राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत.

भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, 48 पैकी 45 जागांसाठी रणनीती आखली

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट आल्यानंतर तत्काळ राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आयुष प्रसाद जिल्हा परिषदेचे सीईओ असताना त्यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला होता.

मणिपूर घटनेचे पुण्यात पडसाद! पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी…

नवीन जिल्हाधिकाऱ्याची नेमणूक होईपर्यंत आयुष प्रसाद यांच्यावर पुण्याचे जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. यासोबतच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचीही बदली झाली असून गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शावाद यांची सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

श्रीमंत MLA ची यादी जाहीर, डी. के. शिवकुमारांकडे सर्वाधिक मालमत्ता, पाहा कोण कितव्या स्थानी?

त्यासोबतच धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांचीही बदली करण्यात आली आहे. मुंढे यांची कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे सचिवपदी बदली झाली आहे. मागील महिन्यात याच विभागात ते अतिरिक्त सचिव होते. त्यांची बदली मराठी भाषा विभागाचे सचिव म्हणून झाली होती.

आता मुंढे पुन्हा मूळ ठिकाणी बदलून आले आहेत. एकाच महिन्यात त्यांची बदली करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात बदली झालेला विभागाच आता मुंढे यांना दिला आहे. दरम्यान, राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube