श्रीमंत MLA ची यादी जाहीर, डी. के. शिवकुमारांकडे सर्वाधिक मालमत्ता, पाहा कोण कितव्या स्थानी?

श्रीमंत MLA ची यादी जाहीर, डी. के. शिवकुमारांकडे सर्वाधिक मालमत्ता, पाहा कोण कितव्या स्थानी?

The richest MLA of the country report : देशातील सर्वात श्रीमंत आमदाराची संपत्ती 1400 कोटींहून अधिक आहे. मात्र पश्चिम बंगालमध्ये एका आमदाराच्या नावावर दोन हजार रुपयेही नाहीत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार, कॉंग्रेसचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार (D.K. Shivakumar) यांची एकूण संपत्ती 1,413 कोटी रुपये असून ते सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. (List of richest and poorest MLAs announced DK Shivakumar richest MLA of the country)

देशातील सर्वात श्रीमंत आमदारांची यादी पाहिली तर या यादीतील पहिले तीन आमदार कर्नाटकातील असल्याचे लक्षात येईल. तर सर्वात गरीब आमदार निर्मल कुमार असून त्यांची संपत्ती अवघी 1700 रुपये आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) च्या अहवालानुसार, कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के शिवकुमार हे 1,413 कोटी रुपयांच्या संपत्तीसह देशातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. 2023 मध्ये निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात शिवकुमार यांनी त्यांच्याकडे एकूण 273 कोटी रुपयांची स्थावर आणि 1,140 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे सांगितले होते.

विराटने रचला इतिहास, 500 व्या सामन्यात झळकावले शतक, असा कारनामा करणार ठरला पहिला खेळाडू 

तर के. एच पुट्टास्वामी गौडा हे देशातील दुसरे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. गौडा हे अपक्ष आमदार आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1,267 कोटी रुपये आहे. त्यांच्या नंतर प्रिया कृष्णा यांचा क्रमांक लागतो. त्यांच्याकडे 1,156 कोटी रुपयांची संपत्ती आहे. संपत्तीबाबत प्रश्न विचारल्यावर डी. के. शिवकुमार म्हणाले, मी सर्वात श्रीमंत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सर्वात श्रीमंत नाही तर सर्वात गरीब देखील नाही. मी स्वत:ला श्रीमंत समजत नाही, कारण माझ्याकडे असलेली संपत्ती मिळविण्यासाठी मला बराच वेळ लागला.

देशातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीतील टॉप 10 आमदारांपैकी चार काँग्रेसचे आणि तीन भारतीय जनता पक्षाचे आहेत. या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे आमदार रिजवान अर्शद म्हणाले, शिवकुमार सारखे लोक व्यावसायिक आहेत आणि त्यात गैर काय? तुम्ही भाजपच्या आमदारांकडेच जरा बघा. प्रामुख्याने खाण घोटाळ्यातील आरोपींकडे बघा. काँग्रेस आमदार रिजवान अर्शद यांच्या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. कर्नाटकचे ज्येष्ठ भाजप नेते सुरेश कुमार म्हणाले, काँग्रेसला श्रीमंत लोक आवडतात, असा टोला लगावला.

कमी मालमत्ता असलेले आमदार

देशातील आमदारांच्या मालमत्तेवरून तयार केलेल्या यादीत सर्वात कमी संपत्ती असलेले आमदार आमदार हे पश्चिम बंगालमधील भाजपचे आमदार निर्मल कुमार धारा आहेत. त्यांची एकूण संपत्ती फक्त 1700 रुपये आहे. याशिवाय, ओडिशातील अपक्ष आमदार मकरंद मुदुली यांच्याकडे केवळ 15,000 रुपयांची संपत्ती आहे. पंजाबमधील आम आदमी पक्षाचे आमदार नरिंदर पाल सिंग यांच्याकडे केवळ 18,370 रुपयांची संपत्ती आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube