विराटने रचला इतिहास, 500 व्या सामन्यात झळकावले शतक, असा कारनामा करणार ठरला पहिला खेळाडू

  • Written By: Published:
विराटने रचला इतिहास, 500 व्या सामन्यात झळकावले शतक, असा कारनामा करणार ठरला पहिला खेळाडू

Virat kohli Century : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. विराट कोहलीने दुसऱ्या दिवशी शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. कोहलीने 191 चेंडूंचा सामना करत 112 धावा करून खेळात आहे. कोहलीसोबतच रवींद्र जडेजानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. टीम इंडियाच्या धावसंख्येने दुसऱ्या दिवशी 300 धावांचा टप्पा पार केला. शतकाच्या जोरावर कोहलीने खास कामगिरी केली आहे. (Ind Vs Wi 2nd Test Virat kohli Century 29th Test Hundred 500th International Match)

विराट कोहली 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. 500 सामन्यात 76 शतके झळकावणारा विराट पहिला खेळाडू ठरला आहे. या आगोदर सचिनने 5000 सामन्यात 75 शतके झळकावली होती.परदेशी भूमीवर सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. आता तो सचिन तेंडुलकरपेक्षा फक्त एक शतक मागे आहे. कोहलीने परदेशी भूमीवर 28 शतके झळकावली आहेत. तर सचिनने 29 शतके झळकावली आहेत.

Sachin vs Virat Kohli : 100 ते 500 सामने… सचिन की विराट कोण कोणावर भारी?

विशेष म्हणजे वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहलीने एबी डिव्हिलियर्सला मागे टाकले आहे. या बाबतीत तो सुनील गावस्कर यांच्या मागे आहेत. गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 13 शतके झळकावली आहेत. कोहलीने 12 शतके झळकावली आहेत. तर कॅलिसनेही 12 शतके झळकावली आहेत. डिव्हिलियर्सने 11 शतके झळकावली आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube