Video : स्वर्ग बघायला गेलो अन् नरक यातना झाल्या, रूपाली पाटलांनी सांगितला थरार…

Video : स्वर्ग बघायला गेलो अन् नरक यातना झाल्या, रूपाली पाटलांनी सांगितला थरार…

Rupali Patil : पहलगाममध्ये (Pahalgam attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. निष्पाप पर्यटकांचे हल्ल्यात प्राण गेल्याने देशभरातून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटीलही (Rupali Patil) श्रीनगरमध्ये अडकल्या होत्या. अखेर काल (दि. 23 एप्रिलला) त्या कुटुंबियांसह सुखरुप पुण्यात परतल्या. त्यानंतर नराधमांना तिथेच मारा असं म्हणत रुपाली पाटील यांनी संताप व्यक्त केला.

‘दहशतवाद्यांना’ पोसण्यासाठी पाकिस्तान किती खर्च करतो? आकडे वाचून पायाखालची जमीन सरकेल 

लेट्सअप मराठीशी बोलताना रुपाली पाटील म्हणाल्या की, आम्ही स्वर्ग बघायला गेलो होतो, पण जीवंतपणीच नरक यातना भोगल्या. मी आता तुमच्याशी बोलू शकतेय, हे फक्त माझं दैव बलवत्तर होतं म्हणून आणि आईवडिलांची काही पुण्याई असेल म्हणून. कारण जिथं हा हल्ला करण्यात आला, तिथं मी आदल्या दिवशीच जाऊन आले होते. तिथलं पर्यटन अनुभवलं. तिथल्या काश्मिरी लोकांनी आम्हाला विश्वासने वागवलं. छोट्या छोट्या मुलांना ते आपल्या खांद्यावर घेऊन सुखरूप वर न्यायचे. इतकी काळजी तिथल्या लोकानी घेतली, काश्मिरी लोकांनी आमची खूप मदत केली, असं सांगत या हल्ल्याला हिंदू मुस्लिम रूप देऊ नका, असं रुपाली पाटील म्हणाल्या.

कृष्णा आंधळे अजूनही फरार… दोन अधिकाऱ्यांची SIT मध्ये नियुक्ती, धनंजय देशमुख यांची माहिती 

दशहतवाद्यांना सुट्टी देऊ नका, नराधमांना तिथेच मारा
पुढं त्या म्हणाल्या की, आधी काश्मिरमधील लोकं दहशतवादाच्या मार्गावर जायची. आता ते काश्मिर राहिलेलं नाही. काश्मिर आता भारतीय म्हणून श्वास घेतंयं. आपण काश्मिरला श्वास दिलाय, ते अतिरेक्यांना पटलेलं नाही. त्यामुळंच हा हल्ला झालाय. काश्मिरी मोदींना विनंती केली, ज्यांनी हल्ला केल्या, त्यांना सोडू नका. मोदींना या भारतीय मुस्लिमांचा विचार करावा. चौघांमधला एक दहशतवादी तर मारलाया, आता त्या तिघांनाही पकडून तिथंच गोळ्या घालून ठार मारा. या दहशतवाद्यांना करार जबाव द्यायलाच पाहिजे.
दशहतवाद्यांना आणि अतिरेक्यांना आता सुट्टी देऊच नका, अशी पाटील यांनी पंतप्रधान मोदींना विनंतही केली.

नाशिकची काही लोकं माझ्याजवळ रडली. ताई आम्ही तुम्हाला मीडियावर बघतो. आम्हाला तुमच्यासोबत घेऊन चला, अशा विनवण्या पर्यटकांनी मला केल्या. शेवटी मी अजितदादांना, मुरलीधर मोहोळांना फोन करून घटनेची माहिती दिली. आता काश्मिरमध्ये मिल्ट्री रस्त्यावर उतरली. आता कोणाच्याही केसालाही धक्का लागणार नाही. अमित शाह हे त्या जागेवर उतरले. याआधी असं कधी झालं नाही, असंही रुपाली पाटील म्हणाल्या.

 

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube