पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरुन राष्ट्रवादीत जुंपली, रुपाली ठोंबरेंनीही ठोकला दावा

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवरुन राष्ट्रवादीत जुंपली, रुपाली ठोंबरेंनीही ठोकला दावा

Pune LokSabha byelections : पुणे लोकसभेच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap), दीपक मानकर (Deepak Mankar) आणि या पाठोपाठ आता रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसची आहे. मात्र, निवडणूक लढवण्याची रस्सीखेच राष्ट्रवादीमध्येच पाहायला मिळत आहे.

रुपाली पाटील म्हणाल्या, मी वयाने लहान जरी असली तरी माझ्याकडे राजकीय समज आहे. त्यामुळे माझ्याबद्दल कोण बोललं काय बोललं त्याला उत्तर देणे हे माझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभणार नाही. आता पुणे लोकसभा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी अशी मागणी मी काँग्रेस पक्षाकडे आणि आमच्या वरिष्ठांकडे केली आहे.

राज्यासाठी उद्या महत्वाचा दिवस! शिंदे राहणार की जाणार? सत्तासंघर्षावर उद्याच निकाल

उमेदवारी कुणाला द्यावी हे पक्ष ठरवणार आहे. पक्षश्रेष्ठी माझ्यावर जी जबाबदारी देखील ती मी प्रामाणिकपणे आणि अतिशय खमक्या पणाने निभावी असा शब्द मी पक्षाला दिला आहे. त्यामुळे पक्ष आदेशाची वाट मला पहावी लागेल.मात्र, मला जर पक्षाने आदेश दिला तर मी पुणे लोकसभा लढवण्यास तयार असल्याचं स्पष्ट मत रूपाली पाटील यांनी व्यक्त केली आहे.

प्रशांत जगताप, दीपक मानकर यांच्यानंतर रुपाली पाटील यांनीही लोकसभेसाठी इच्छा व्यक्त केल्याने राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाली आहे.

भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं नुकतच निधन झाल्यामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे लवकरच पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची वातावरण निर्मिती केली जात आहे.

‘सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत न आल्यास पुन्हा सुनावणी’ उज्वल निकम असे का म्हणाले?

भाजपकडून गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय काकडे, मेधा कुलकर्णी आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची नावे चर्चेत आहेत. त्यापैकी स्वरदा बापट यांच्या नावावर भाजकडून एक मत होऊ शकते, अशी चर्चा आहे.

दरम्यान, पुणे लोकसभेची जागा ही काँग्रेसकडे आहे. मात्र, ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडावी असं जाहीर आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केल आहे. त्यानंतर काँग्रेसकडून आपणच ही जागा लढवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Shinde VS Thackery : …तर उद्धव ठाकरे पुन्हा मुखमंत्री होणार, घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले

मात्र, पुण्याच्या बदल्यात काँग्रेसला राज्यातील दुसरी जागा देण्याचा राष्ट्रवादी विचार करत असल्याचे मत जगताप यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता पोटनिवडणूक कधी लागणार आणि कुणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube