पुण्याचे पालकमंत्री अजित पवार; सगळे त्यांना ‘दादा’ म्हणतात तरी पुण्यातच या गोष्टी…राऊतांचे फटकारे

  • Written By: Published:
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार; सगळे त्यांना ‘दादा’ म्हणतात तरी पुण्यातच या गोष्टी…राऊतांचे फटकारे

Sanjay Raut on Pune Rape Case : पुण्यातील सवारगेट बस स्थानकाच्या परिसरात शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाला. त्या प्रकरणावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार ताशेरे ओढलेत. (Sanjay Raut) आरोपीला पकडून पोलीस सरकारने उपकार केले का ? असा सवाल राऊत यांनी विचारला.

Video : शेवटच्या माहितीवरून आरोपीला पकडलं; कुणी दिली माहिती? पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

एवढंच नव्हे तर या अत्याचार प्रकरणावरून बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानामुळेही राऊत संतापले असून त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत अशा शब्दांत राऊतांनी कदम यांच्यावर टीका केली. कदम यांच्या वक्तव्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

संजय राऊत संतापले

आमचे ग-हराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत. ते म्हणतात की आतमध्ये ( बस) हाणामारी झाली, शांतपणे बलात्कार पडला, त्यामुळे बाहेर कळलं नाही, ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे. एका महिलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग, बलात्कार होतो, आणि तिने स्ट्रगल केलं नाही , हा त्यांचा शब्द आहे. तिने स्ट्रगल केलं नाही त्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही. तिचा गळा दाबला, तोंड दाबलं, तिच्यावर जबरदस्ती केली.आणि हे काय बोलतात, असं म्हणत राऊतांनी कदमांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

अजित पवारांवराचाही समाचार?

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत. त्यांना सगळे दादा म्हणतात. मग पुण्यातच या गोष्टी का घडत आहेत? असा सवाल विचारत कायद्याचा धाक उरलेला नाही , पोलिसांची भीती राहिलेली नाही, असा आरोप राऊतांनी केला. पोलीस असो की कायदा, आम्ही कसंही मॅनेज करू असा विश्वास गुंडांमध्ये आहे. न्यायालयात हवा तो निर्णय घेऊ शकतो हा एक आत्मविश्वास आहे असंही राऊत म्हणाले.

ठाण्यातील बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडली, त्यातील अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला तेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या, आता निवडणुका नाहीत. तो ठाणे जिल्हा होता, आता पुणे जिल्हा आहे, असं आरोप करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube