Sharad Pawar यांचे निकटवर्तीय बडे उद्योजक अनिरुद्ध देशपांडेंच्या कार्यालयावर छापे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय आणि पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन (City Group President) आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे (Aniruddh Deshpande) यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Raid) अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. अनिरुद्ध देशपांडे यांचे घर तसेच कार्यालयाची झाडाझडती पहाटेपासूनच सुरू आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
आयकर विभागाकडून पुण्यात ८ ठिकाणी आयकर विभागाची मोठी छापेमारी सुरु आहे. मुख्यत आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याचे बोलले जात आहे. देशपांडे यांचे राज्यातील बड्या राजकाराण्यांशी निकटचे संबंध आहेत. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
आयकर विभागाने पुण्यात एकूण सहा ते आठ ठिकाणी छापे टाकल्याची प्राथमिक माहिती असून अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयाचाही त्यात समावेश आहे. दिल्ली आणि मुंबईत आयकर विभागाने मंगळवारी बीबीसी वृत्तसंस्थेच्या कार्यालयांमध्ये सर्वेक्षण केले होते. त्यामुळे आयकर विभागाच्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती. आता दुसर्या दिवशी धवारी पुण्यात आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत.