आव्हाडांनी पुण्यात येऊन अजितदादांना शिंगावर घेतले; आतापर्यंत त्यांची केवळ दादागिरीच !

  • Written By: Published:
आव्हाडांनी पुण्यात येऊन अजितदादांना शिंगावर घेतले; आतापर्यंत त्यांची केवळ दादागिरीच !

Jitendra Awhad On Ajit Pawar : पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यापासून शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर (Ajit Pawar) थेट हल्लाबोल करत आहेत. अजित पवारांवर बोलण्याची कोणतीच संधी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सोडत आहे. अमोल कोल्हेंना यांना लोकसभेला पाडणार, असे उघड चँलेज अजित पवारांनी दिले आहे. त्याला उत्तर देताना आव्हाड यांनी अजित पवारांवर आरोप केला आहे. धमकी देण्याचा स्वभाव अजित पवारांचा पूर्वीपासूनच आहे. आता ते उघड धमक्या देत आहेत. आजपर्यंत पक्षात त्यांनी केवळ दागागिरीच केली असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

हेमंत सोरेन यांची पत्नी कल्पना सोरेन होणार मुख्यमंत्री? भाजपच्या खासदारच्या दाव्याने खळबळ

आव्हाड म्हणाले, धमकी देण्याचा स्वभाव अजित पवारांचा पूर्वीपासूनच आहे. आता जनतेला ते दिसून येत आहे.
आता ते उघड धमक्या देत आहेत. आजपर्यंत पक्षात देखील आजपर्यंत त्यांनी तेच केले. शरद पवारांच्या जवळील चांगले माणसे त्यांनी तोडली आहेत.अजित पवारांची ही दादागिरीच आहे.अमोल कोल्हे यांना पाडणार अशी धमकी दिली आहे? पण नशीब लिहिणारा कुणीही जन्माला नाही आला. ज्या दिवशी कुणाला वाटते की मी याचे नशीब लिहितो. त्या दिवशी समजायचे. त्याची उतरता काळ जवळ आला आहे, असे समजायचे. यावर मी शंभर टक्के ठाम असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.

Asaduddin Owaisi चं मुस्लिम तरूणांना आवाहन; तरूणांनो मशिदींना जपा नाहीतर…


रुपाली चाकणकरांनी इतिहास-भूगोल जाणून घ्यावा…

अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी शेतकरी आक्रोश मोर्चावरून खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली होती. हे दोन्ही खासदार अजित पवार यांच्यामुळे निवडून आले आहेत, असे चाकणकर यांनी म्हटले आहे. त्याला जोरदार प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले. देशभरात मोठे झालेले शरद पवारांचे बारामतीत काहीच योगदान नाही का ? साठ वर्ष असेच ते राजकारण करत देशभर फिरत आहेत का ? कधी एकेकाळी खेड मतदारसंघात ते निवडून आले आहेत. रुपाली चाकणकरांनी बोलताना इतिहास-भूगोल जाणून घ्यावा. शरद पवारांनी मतदारसंघ निर्माण केला आहे. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना निवडून नेते बनवले आहे. त्यातलेच एक अजित पवार एक आहेत.
अजित पवार नेते कुणामुळे झाले याचा इतिहास वाचून भान ठेवावे.

आंबेडकरांना महाविकास आघाडीत यावेच…

राजकीय परिस्थितीसाठी शरद पवार व उद्धव ठाकरे धडपडत आहेत, अशी टीका वंचित बहुजनचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर देणे टाळले आहे. ते म्हणाले मी त्यांच्यावर बोलणार नाही. माझी मनापासून इच्छा आहे की वंचित आणि महाविकास आघाडी यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका लढवाव्यात यातच महाराष्ट्राचे हीत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube