“मी पवार साहेबांच्या घरातून बाहेर पडलो अन्..”, झेंडेंनी सांगितला तिकीटाचा किस्सा!
Sambhaji Zende : राज्यात विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Elections) धामधूम सुरू आहे. इच्छुकांकडून चाचपणी सुरू आहे. यामध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडणूक (Purandar Constituency) लढण्याची तयारी संभाजी झेंडे यांनी केली आहे. यानिमित्त त्यांनी लेट्सअप मराठीशी खास संवाद साधत एक जुना किस्सा सांगितला. खरंतर हा किस्सा त्यांच्या उमेदवारीशी निगडीत होता. मागील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी (Elections 2024) मिळाली नाही म्हणून नाराज न होता उमेदवारी फायनल झालेल्या उमेदवाराचं अभिनंदन केलं. राजकारणात दुर्मिळ असणारा हा प्रसंग त्यांच्याबाबतीत घडला होता. यावेळी त्यांनी निवडणुकीसह राजकीय, प्रशासकीय मुद्द्यांवर अगदी बेधडक मते व्यक्त केली.
“२०१९ मध्ये थांबलो पण, यंदा पुरंदर लढणारच!” शरद पवारांच्या शिलेदाराचा पक्का निर्धार
‘२०१९ मध्ये एक निर्णय घेण्यात आला. आपण एकत्रितरित्या लढलं तर निवडणूक जिंकू शकतो. म्हणून मलाही फॉर्म भरायला सांगण्यात आलेलं होतं. फॉर्म तयारीत होता सबमिट करायचा राहिला होता. त्यानंतर एक दोन तीन दिवस अगोदर शेवटचा जो दिवस होता चार ऑक्टोबर २०१९ त्याचे दोन दिवस अगोदर मला सांगण्यात आलं, की तुम्हाला थांबावं लागेल तुमचा पुढच्या वेळी विचार करू. परंतु सध्या तरी तुम्ही थांबा. मतांचं विभाजन होऊन तिसऱ्याचा फायदा होण्यापेक्षा त्यावेळी मला थांबवण्यात आलं.
विजय शिवतारे ज्यावेळी शरद पवार, अजित पवारांच्या विरोधात बोलतात त्याचवेळी विजय शिवतारे अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसतात हे पुरंदरच्या जनतेला आवडलं आहे का? या प्रश्नाच्या उत्तरात झेंडे म्हणाले, ‘विजय शिवतारे यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका लोकांना पटलेली नाही. मी त्यांच्यावर काही टीका करत नाही पण त्यांची भूमिका लोकांना पटली नव्हती हे लोकांनी दाखवून दिलं आहे.’
राजकीय टीका तुम्ही टाळताय का? असाही सवाल विचारण्यात आला. त्यावर ‘राजकीय टीका मी कुणावरच करत नाही मुद्द्यांवर मात्र मी भरपूर टीका करतो. कारण माझं असं मानणं आहे की राजकारण हे व्यक्तिद्वेषाचं नसावं. राजकारणात व्यक्तिद्वेषाला जागाच नाही. विचारसरणी म्हणून पक्ष वेगळा असू शकतो. पण त्यात येतात ते सगळे समाजकारणासाठीच. त्यामुळे कुणाचा वैयक्तिक द्वेष माझ्या डिक्शनरीतच नाही’.
‘मागच्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा उमेदवारीसाठी संजय जगतापांचं नाव फायनल झालं त्यावेळी मी दुसऱ्या मिनिटाला पवार साहेबांच्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांना फोन करून त्यांचं अभिनंदनही केलं. योगायोगाने प्रचाराचा नारळही माझ्याच गावात फुटला होता. त्यामुळे व्यक्तिगत द्वेषाचा प्रश्चच कुठे उपस्थित होत नाही’, असे संभाजी झेंडे यावेळी म्हणाले.
पर्यटन समृद्ध अन् सुपरफास्ट पुरंदर; संभाजी झेंडेंचं व्हिजन एकदम क्लिअर..