शिवसेना वैद्यकीय कक्ष शहर प्रमुखाच्या वडिलांचं निधन;पुण्यात सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालय फोडलं
Sahyadri Multi Specialty Hospital मध्ये शिवसेना वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळांच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर रुग्णालयाची तोडफोड केली
Shiv Sena Medical Cell City Chief’s father passes away; Sahyadri Multi Specialty Hospital in Pune vandalized : पुण्यामध्ये शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात निधन झालं. त्यानंतर मात्र मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. कारण या निधनानंतर हडपसर येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
शशी थरूर यांनी नाकारला ‘वीर सावरकर पुरस्कार’, नेमकं कारण काय?
अजय सपकाळ हे एकनाथ शिंदे क,यांच्या शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख आहेत. मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने त्याची खुन्नस काढत माझ्या वडिलांना या लोकांनी शिक्षा दिल्याचा आरोप अजय सपकाळ यांनी केला आहे. अजय सपकाळ यांच्या वडिलांचे 28 तारखेला साडेबारा वाजता अल्सरच ऑपरेशन होतं.
Arijit Singh Fitratein Song : अरिजित सिंगचं शानदार कमबॅक; ‘फितरतें’ ची सोशल मीडियावर धूम
मी डॉक्टरांकडे माहिती घेऊन माझ्या वडिलांना रुग्णालयात ऍडमिट केलं होतं दोन दिवसात व्यवस्थित होतील असं त्यांनी मला सांगितलं. 28 तारखेला ऑपरेशन झालं त्यानंतर दोन दिवसात माझे वडील व्यवस्थित झाले. दोन दिवसात ते शुद्धीवर आले होते. त्यांचे व्हेंटिलेटर काढलेलं होतं त्यांनी आमच्या सोबत गप्पा मारल्या. दोन दिवस ऑपरेशन झालेल्या माणसाला तेथील डॉक्टरांनी खुर्चीवर बसवलं आणि 20 ते 25 टाक्यांपैकी त्यांचे सहा-सात टाके त्यावेळेस तुटले. याबाबत डॉक्टरांनी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन झाल असल्याचं सांगितलं आणि स्कॅन करायला घेऊन गेले.
मोदी सरकारच्या सर्व योजना आता ‘सनसेट क्लॉज’ च्या अखत्यारीत येणार; आदेश निघाले
अल्सरच ऑपरेशन झालेल्या रुग्णाच्या फुफुसात पाणी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं नाही. फक्त इन्फेक्शन आहे इतकच सांगत राहिले. डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप अजय सपकाळ यांनी केला आहे.शिंदे साहेब मी तुम्हाला सांगत आहे मी शिवसेनेचा शहर प्रमुख असतानाही तुमच्या कार्यकर्त्याला हा न्याय मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील.
तोडफोड कोणी केली याची आम्हाला कल्पना नाही पण सर्वसामान्य माणसाला रोज या रुग्णालयाच मारण्याचे काम आहे. हे लोक इन्शुरन्सचे पैसे उकळतात आणि माणसं मारतात. जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही. तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत.मी वैद्यकीय क्षेत्रात काम करतो याची खुन्नस काढून त्याची शिक्षा माझ्या वडिलांना या लोकांनी दिली आहे.असा आरोप सपकाळ यांनी केला आहे.
