जिजाऊंचे बाळकडू कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; गर्भसंस्कार तज्ज्ञ डॉ. विष्णू माने यांनी केलं मार्गदर्शन

  • Written By: Published:
जिजाऊंचे बाळकडू कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; गर्भसंस्कार तज्ज्ञ डॉ. विष्णू माने यांनी केलं मार्गदर्शन

Jijaunche BalKadu Workshop : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त एलप्रो मॉल, पीसीएमसी, पुणे येथे “जिजाऊंचे बाळकडू” या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेला ७०० हून अधिक उत्साही (Pregnancy) गर्भवती मातांची उपस्थिती लाभली. सुप्रसिद्ध गर्भसंस्कार तज्ज्ञ डॉ. विष्णू माने यांनी गर्भवती मातांना छत्रपती शिवरायांसारखे पराक्रमी व तेजस्वी मूल जन्माला घालण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिक आणि भावनिक बळाची माहिती दिली.

शिवजयंती निमित्त गर्भसंस्कारांवर आधारीत डॉ. विष्णू माने यांचा जिजाऊंचे बाळकडू कार्यक्रम

ही कार्यशाळा मातृत्वाच्या पवित्र प्रवासात असलेल्या महिलांसाठी मार्गदर्शक ठरली. गर्भसंस्काराच्या माध्यमातून बाळाच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक प्रभाव कसा पाडता येतो, याबाबत डॉ. माने यांनी सखोल मार्गदर्शन केले. उपस्थित मातांनी या कार्यशाळेमुळे आत्मविश्वास वाढल्याचे आणि गर्भसंस्काराचे महत्व नव्याने उमगल्याचे सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या तेजस्वी व कर्तृत्ववान नेतृत्वाचा जन्म घडवण्याच्या दृष्टीने “जिजाऊंचे बाळकडू” ही कार्यशाळा प्रेरणादायी ठरली. मातांनी जिजाऊसारख्या समर्थ माता होण्याचा संकल्प या कार्यशाळेत केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी मातांनी आणि उपस्थितांनी संयोजकांचे विशेष आभार मानले.

पंतप्रधान मातृत्व वंदना योजना

केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येत असलेल्या पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेंतर्गत पहिल्या अपत्यासाठी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर दुसऱ्या अपत्यासाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पण जर दुसरे मूल मुलगी असेल. त्यानंतरच दुसऱ्यांदा योजनेंतर्गत लाभ दिला जातो. पहिल्या मुलासाठी दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात ज्यामध्ये पहिल्या हप्त्यात 3000 रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 2000 रुपये दिले जातात. तर दुसरे मूल मुलगी असल्यास 6000 रुपये एका हप्त्यात दिले जातात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या