Pune News : जिथे केली तोडफोड, तिथेच धुलाई करत काढली धिंड; दहशत माजवणाऱ्या वैभव इक्करला घडवली अद्दल

Pune News : जिथे केली तोडफोड, तिथेच धुलाई करत काढली धिंड;  दहशत माजवणाऱ्या वैभव इक्करला घडवली अद्दल

पुणे : पुण्यात टोळक्यांचे धुडगूस घालण्याचे सत्र सुरूच आहे. तळजाई पठार परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना ताजी असतांनाच मंगळवारी सिंहगड रोडवरील खडकवासला येथील हॉटेलची तोडफोड करून लुटमार करणाऱ्या वैभव इक्कर (Vaibhav Ikkar) या सराईत गुन्हेगाराची पोलिसांनी चांगलीच धुलाई केली आहे. आपण कोणाच्या बापाला घाबरत नाही, असं सांगत संबंधित गुन्हेगार खडकवासला किरकटवाडी शीव रस्ता परिसरात दहशत माजवत होता. त्या रस्त्यावरून पोलिसांनी (Haveli Police Station) त्यांची धुलाई करत धिंड काढली. (The Haweli police damn the gangsters Vaibhav Ikkar who were terrorizing the Sinhagad road area)

वैभव इक्कर (वय 23, कोल्हेवाडी, खडकवासला) असं धिंड काढलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. रविवारी 23 जुलै रोजी त्याने साथीदारांच्या मदतीने किरकिटवाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून तोडफोड केली. एवढचं नाही तर त्याने तोडफोड तर केलीच, शिवाय, हॉटेलमधील कामगारांना मारहान करत पैसेही लुटले होते. धक्कादायक म्हणजे, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी आलेले हवेली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक या कर्मचाऱ्यांवरही त्याने हल्ला केला होता.

केंद्राची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव; ED चे संचालक संजय मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी 

याबाबत अधिक माहिती अशी की, तोडफोड करणाऱ्या हॉटेलचालकाने हवेली पोलिसात तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी सराईत गुन्हेगार वैभव इक्कर आणि त्याचा साथीदार चेतन चोरघे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी वैभव इक्कर आणि त्याच्या साथीदाराला हातकड्या ठोकल्या आणि ज्या हॉटेलची तोडफोड केली. तिथे आणून त्याची चांगलीच धुलाई केली. तसेच ज्या रस्त्यांवर त्याने दहशत निर्माण केली. त्याच रस्त्यावरून त्याची धिंड काढली. गेल्या काही दिवसांपासून तो सामान्य नागरिकांना या ना त्या कारणाने त्रास देण्याचे काम करत होते. मात्र पोलिसांनी त्याची दहशत मोडून काढली आहे.

किरकिटवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली होती. त्यामुळे हवेली पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या गुंडांना पकडून पोलिस त्यांना चांगलीच अद्दल घडवत आहेत. वैभव इक्कर आणि त्याच्या साथीदारांवर केलेल्या कारवाईमुळे पोलिसांच्या कामाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

दरम्यान, एकीकडे नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या गुंडाची पुणे पोलिसांकडून धिंड काढली जात आहे. असं असूनही पुण्यात कायद्याला न घाबरता काही टोळके आपली दहशत पसरवत आहेत. त्यामुळं पोलिसांची जरब संपली की, काय? असा सवालही उपस्थित होत आहे. दरम्यान, पुण्यातील गुंडावर वचक निर्माण करण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube