वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात

वसंत मोरेंच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : राज्यभरात होळीचा (Holi)सण आनंदात साजरा केला जात असतानाच, पुण्यात (Pune)एक खळबळजनक घटना समोर आली होती. पुण्यातील धडाडीचे मनसे नेते (MNS Leader) वसंत मोरे (Vasant More)यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आता या धमकी देणाऱ्या खंडणीखोराला पोलिसांनी (Police)मुंबईमधून (Mumbai)एकाला अटक केल्याची माहिती समोर आलीय. तीस लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या मुलाला गोळ्या घालू अशी धमकी वसंत मोरे यांना देण्यात आली होती. त्यामुळं पुण्यात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी तपासचक्र फिरवत आता एकाला ताब्यात घेतलंय. त्यामुळं आता यामागं नेमका कोणाचा हात आहे का? हे नेमकं कोणाच्या सांगण्यावरुन तर केलं जात नव्हतं ना? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता मिळणार आहेत.

उदयनराजेंच्या पेंटिंगला विरोध; शिवेंद्रराजे भोसले म्हणतात, ‘साठी बुद्धी नाठी’

दोन दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत याबद्दल तक्रार केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, माझा मुलगा रुपेश मोरे (Rupesh More) याला मागील एक महिन्यापासून धमक्या येत आहे. व्हाट्सअप चॅटिंग तसेच फोनवरून त्याला 30 लाख रुपयांची खंडणी मागितली जात आहे. तसेच ‘तू हलके में मत ले… वरना तुझे समज में आयेगा… इलेक्शन के टाईम तुझे देख लेंगे, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत.

4 फेब्रुवारीला पहिल्यांदा जेव्हा अशा प्रकारे धमक्या आल्या तेव्हा आम्ही लगेच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर हा प्रकार थांबला होता. मात्र, पाच-सहा दिवसानंतर पुन्हा हा प्रकार सुरु झाला असून मागील एक महिन्यापासून धमक्या येत असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी सांगितलं होतं.

मोरे म्हणाले की, एका मुस्लिम महिलेच्या नावानं बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करण्यात आलं आहे. तसेच त्या महिलेचा भाऊ असं सांगून व्हाट्सअप चॅटिंगद्वारे 30 लाख रुपयांची खंडणी दे. खराडी ई-ऑन आयटी पार्क येथे एका कारमध्ये 30 लाख रुपयांची बॅग आणून ठेव असं सांगितलं जातंय. तू आम्हाला हलक्यात घेऊ नको. अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत तुला बरोबर सगळं समजेल अशी धमकी दिली जात आहे.

सुरुवातीला आम्हला वाटलं कोणीतरी खोडसाळपणा करत आहे. म्हणून आम्ही दुर्लक्ष केलं होतं. पण हा प्रकार जवळपास एक महिन्यापासून सुरु असल्यानं आम्ही पोलिसांत तक्रार दिली. परंतु, आम्ही कोणालाही घाबरत नाही. आमच्या कुटुंबावर कोणी वाकड्या नजरेनं पाहात असेल तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ असंही वसंत मोरे यांनी म्हटलं होतं. आता पोलिसांनी या खंडणीखोरांपैकी एकाला ताब्यात घेतलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube