Pune News : भाजप नेते गणेश बिडकरांना धमकीचा फोन, 25 लाख द्या, अन्यथा…
Threatening call to Ganesh Bidkar : पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते गणेश बिडकर (Ganesh Bidkar) यांच्याकडे फोनद्वारे पुन्हा एकदा खंडणी मागण्यात आली. रविवारी रात्री हा प्रकार घडला. त्यानंतर गणेश बिडकर यांनी तातडीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Bhaiyya Ji: मनोज बाजपेयी अभिनीत ‘भैय्या जी’चा खतरनाक टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडिओ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बिडकर हे रविवारी सायंकाळी लष्कर परिसरातील बागबान हॉटेल परिसरात होते. यावेळी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्तीने बिडकर यांच्याकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणीचे पैसे न दिल्यास राजकीय करिअर संपवून टाकेन, व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकीही दिली. त्यानंतर बिडकर यांनी तातडीने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेशी संपर्क साधला असता पोलिसांनी तातडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सध्या खंडणी विरोधी पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.
काँग्रसचा स्टार प्रचारक पुन्हा मैदानात; राजीनामा मागे घेत नसीम खान यांचा यू-टर्न
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना पुन्हा एकदा बिडकर यांना खंडणीची मागणी करण्यात आली. त्यामुळं पुण्यातील राजकीय वर्तृळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, याआधीही म्हणजे मार्च २०२३ मध्ये गणेश बिडकर यांना खंडणीसीठी फोन आले होते. बिडकर यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप कॉल करून २५ लाखांची खंडणी मागितली होती. तेव्हाही शिवीगाळ करत खंडणी न दिल्यास राजकीय करिअर संपवू टाकू, बदनामी करू, अशी धमकी देण्यात आली होती.